सिद्धार्थ भदर्गे तालुका प्रतिनिधी मावळ
मावळ : महाराष्ट्र राज्य सुरक्षा रक्षक श्रम कामगार युनियन महाराष्ट्र राज्य या संघटने चे वाया एम सी पूना इंटरनॅशनल हॉटेल पुणे या ठिकाणी पुणे जिल्ह्यातील सुरक्षा रक्षक यांच्यासाठी संवाद मेळाव्याचे आयोजन व पुणे जिल्हा नवीन कार्यकारणी नियुक्त करण्यात आली.या कार्यक्रमासाठी मार्गदर्शक म्हणून महाराष्ट्र राज्य सुरक्षा रक्षक श्रम कामगार युनियन चे संस्थापक अध्यक्ष मा संजय दादा पाटील हे उपस्थित होते. या वेळी त्यांनी पुणे जिल्ह्यातील सुरक्षा रक्षक यांच्या समस्या जाणून घेतल्या व त्यावर काय उपाय योजना करता येतील या विषयी मार्गदर्शन केले.या वेळी पुणे बोर्डामध्ये वेटिंगवर असलेल्या सर्व सुरक्षा रक्षक यांना लवकरात लवकर भरती करून घ्यावं.जे सुरक्षा रक्षक यांचे पॉईंट गेले आहेत अशा सुरक्षा रक्षक यांना वेटिंग लिस्ट वर न टाकता तात्काळ जागा उपलब्ध असलेल्या दुसऱ्या आस्थापनात नेमणूक द्यावी मंडळातील नोंदीत शासकीय अस्थपणावर कार्यवाही करणे, राष्ट्रीयकृत बँकेत सुरक्षा रक्षक यांचे खाते वर्ग करण्यात यावीत. सुरक्षा रक्षक यांना बँक कडून कर्ज उपलब्ध करून द्यावं या मागण्या करण्यात आल्या. या वेळी मा संजयदादा पाटील संस्थापक अध्यक्ष महाराष्ट्र राज्य सुरक्षा रक्षक श्रम कामगार युनियन यांच्या आदेशाने पुणे जिल्हा कार्यकारणीची निवड करण्यात आली. पुणे जिल्हा अध्यक्ष पदी वीरेंद्र भालेराव, उपाध्यक्ष नवनाथ कोळपे, तर मावळ तालुका अध्यक्ष पदी सिद्धार्थ भदर्गे तर उपाध्यक्ष पदी भागवत दराडे यांची नियुतकी करण्यात आली. या कार्यक्रम साठी पुणे जिल्हा सुरक्षा रक्षक मंडळातील अनेक सुरक्षा रक्षक यांची उपस्थिती मोठ्या संख्येने होती.

