निलेश सोनोने ग्रामीण प्रतिनिधी पातुर
पातुर पंचायत समिती अंतर्गत मळसुर येथे वृक्ष.संगोपनात घोळ प्रकरणाची चौकशी दोन महिन्यापासून करण्यास दिरंगाई केली जात असल्याने मळसुर येथील रोजगार सेवका वृक्ष संगोपनासाठी अनुपस्थित मजुराची उपस्थिती दाखवून देयक हडपल्याचा आरोप मळसुर येथील माजी सरपंच जगदीश देवकते प्रेम कुमार कंकाळ यांनी 19 डिसेंबर 24 रोजी अकोला जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी पातुर पंचायत समितीचे गटविकास अधिकारी यांना दिलेल्या तक्रारीतून केला होता मळसुर येथे सर्वे नं 125 या ई क्लास जागेत ग्रामपंचायत मार्फत वुक्ष.लागवड करण्यात आली आहे रोजगार हमी योजना अंतर्गत वृक्ष संगोपन करण्यासाठी मजुराची उपस्थिती दाखविण्याची जबाबदारी रोजगार सेवकांची असते परंतु रोजगार सेवकाची तीन मुले पुणे येथे कंपनीत काम करीत आहे तरीही रोजगार सेवकांनी वृक्ष संगोपणासाठी तीन मुले व पत्नीचे चार मजुरांची उपस्थिती दाखवून देयक हडपल्याचा आरोप करण्यात आला होता दोन महिने उलटून अग्यापही चौकशी करण्यात आली नाही याकडे संबंधित वरिष्ठ अधिकाऱ्यांनी दखल घेऊन चौकशी करून कारवाई करण्याची मागणी ग्रामस्थ कडून.होत आहे.रोजगार सेवकाला अभय कोणाचे जगदीश देवकते माजी सरपंच मळसू वृक्ष संगोपनासाठी रोजगार सेवकाने स्वतःच्या कुटुंबातील अनुपस्थिती मजुराची उपस्थिती दाखवून उपस्थिती दाखवून देयक हडपल्या बाबतची तक्रार करून दोन महिने उलटून मात्र अद्यापही चौकशी करण्यात टाळाटाळ असून रोजगार सेवकाला अभय कोणाची आहे असा प्रश्न उपस्थित होत आहे

