पवन ठाकरे ग्रामीण प्रतिनिधी संग्रामपूर
संग्रामपूर: मराठी पत्रकार परिषद संलग्न संग्रामपूर तालुका पत्रकार संघाचे तालुका अध्यक्षपदी ज्ञानेश्वर पाटील दांदळे यांची निवड झाल्याबद्दल तसेच योगेश रावणकार रिंगणवाडी व गोपाल तायडे मरायखेड यांची एमपीएससी मार्फत महसूल विभागात नियुक्ती झाल्याबद्दल सर्व सत्कारमूर्ती यांचा वरवट बकाल येथे सत्कार करण्यात आला प्रास्तविक कैलाश कडाळे पाटिल यांनी केले तर कार्यक्रमाचे अध्यक्ष अँड भालेराव साहेब यांनी आपल्या भाषणातुन सत्कारमुर्ती यांचे भरभरुन कौतुक केले यावेळी मराठा पाटील सेवा समितीचे वतीने अँड.भालेराव साहेब श्रीकृष्ण काळे कैलाश कडाळे पाटिल नाना पाटिल संजय खोंड स्वप्निल देशमुख संतोष रावणकर विजय तायडे अनिल पाटिल आनंद पाटिल गोपाल बोरोकार विशाल बकाल बजरंग पाटिल सतिष जवंजाळ आशिष पाचपोर,समितीचे पदाधिकारी व सदस्य मोठ्या संख्येने उपस्थित होते. उपस्थित असलेल्या सर्व सदस्य व समाज बांधवाचे श्रीकृष्ण काळे यांनी आभार व्यक्त केले.

