पवन ठाकरे ग्रामीण प्रतिनिधी संग्रामपूर
संग्रामपूर: पळसोडा येथे दिनांक 10 फेब्रुवारी रोजी दुपारचे सुमारास एका टिनाच्या घराला अन्नधान्य घरगुती साहित्य जळून खाक झाले असून संपूर्ण कुटुंब उघड्यावर पडले आहे. टिनाच्या घरात विष्णू सोनाजी भेंडोकर यांचे कुटुंबात 3 भाऊ व आई वडील असे एकत्र राहत होते. त्यांचे संपूर्ण कुटुंब घरी नसताना 10 फेब्रुवारी रोजी दुपारी 3 ते 4 वाजता च्या दरम्यान घराला आग लागून घरातील 10 क्विंटल तूर 5 क्विंटल ज्वारी 2 क्विंटल गहू व घरातील पलंगावरील बेड 3 फिज 3 कपाट 3 कुलर आणि रोख 20 हजार रुपये जळून खाक झाले आहेत. घटना समजताच गावातील नागरिकांनी मिळेल त्या भांड्यात पाणी आणून आग विझविण्याचा प्रयत्न केला. अंगावरील कपडे वगळता सर्व जळून खा झाले.आगीचे कारण अद्यापही समजू शकले नाही. सदर घटनेची तक्रार सोनाळा पोलिस स्टेशन ला दिल्याचे समजते याबाबत महसूल विभागाने दाखल घेवून शासनाने नुकसान भरपाई द्यावी. अशी पळसोडा गावकरी व नातेवाईकांकडून मागणी होत आहे.

