देवलाल आकोदे सर्कल प्रतिनिधी हसनाबाद
भोकरदन तालुक्यातील हसनाबाद येथे संत शिरोमणी रविदास महाराज यांची ६४८ वी जयंती मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आली .प्रथमत: समाज बांधवांच्या वतीने श्री रामदेवजी बाबा मंदिरात,तदनंतर ग्रामपंचायत कार्यालयात व तसेच जिल्हा परिषद प्राथमिक शाळा मधुनगर,जिल्हा परिषद प्राथमिक शाळा हसनाबाद,जिल्हा परिषद प्राथमिक शाळा अहिल्यानगर यासह अनेक ठिकाणी विविध कार्यालयात जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली.यावेळी सरपंच सुरेश काकाजी,उपसरपंच जनार्दन खरात,चेअरमन गणपत माऊली,मुख्याध्यापक रामदास लेंभे,शिक्षक सुनील सरकटे,दत्तात्रय वाडेकर,लक्ष्मण साळवे ,मुख्याध्यापक भास्कर पठाडे तसेच त्यांचे पूर्ण स्टॉप अंगणवाडी सेविका छाया वैष्णव,मुख्याध्यापक बबन मैंद सर,विजय ढाकेफळे,रामेश्वर व्यवहारे,समाधान खडेकर यांच्यासह विद्यार्थी व समाजातील सर्वांची मोठ्या प्रमाणात जयंती उत्सव साजरी करण्यासाठी उपस्थिती होती.

