मारोती बारसागडे जिल्हा प्रतिनिधी गडचिरोली
गडचिरोली :-दुचाकी वापरतांना नेहमी हेल्मेटचा तर चारचाकी चालवताना सीट बेल्टचा वापर करावा.रस्त्यावर कोणत्याही प्रकारचा अपघात झाल्याचे आढळल्यास निसंकोचपणाने मदत करावी.तुमची छोटीसी मदत कुणाचाही जीव वाचवू शकते.शासनाने घालून दिलेल्या नियमांचे व अटींचे पालन केल्यास प्रवास सुखकर होईल जीवनात कोणतेही संकट येणार नाही असे प्रतीपादन मोटार वाहन निरिक्षक पवन येवले यांनी केले.नेहरू युवा केंद्र गडचिरोली, केवळरामजी हरडे महाविद्यालय चामोर्शी यांच्या संयुक्त विद्यमाने व प्रादेशिक परिवहन कार्यालयाच्या वतीने जिल्हा युवा अधिकारी अमित पुंडे यांच्या मार्गदर्शनात रस्ता सुरक्षा अभियान अंतर्गत पथनाट्य व मार्गदर्शन कार्यक्रम पार पडला त्यावेळी ते मार्गदर्शक म्हणून बोलत होते.कार्यक्रमाला हरडे महाविद्यालयाचे प्रा डॉ.पवन नाईक, नेहरू युवा केंद्राच्या तालुका समन्वयक कल्याणी गायकवाड प्रामुख्याने अपस्थित होते.रस्त्यावरुन वाहनाने प्रवास करतांना नियम व अटींचे पालन करणे किती महत्त्वाचे आहे हे मुलांनी पथनाट्याद्वारे पटवून दिले.सर्व विद्यार्थ्यांनी उत्तम सादरीकरण केले.

