अर्थशास्त्र व ईंग्रजी विभागाचा पुढाकार सीताबाई महाविद्यालयात राष्ट्रिय परिषद
भारतातील प्रत्येक नागरिकांच्या सर्व प्रकारच्या हक्कांचे संरक्षण करून त्यांना न्याय देण्याचे कार्य भारतीय राज्यघटनाच करू शकते .भारतीय राज्यघटनेमध्ये अंतर्भूत तत्त्वानुसार राज्यकर्त्यांनी जर कारभार केला तर भारताला एक समृद्ध राष्ट्र म्हणुन ओळख मिळेल कारण भारतीय राज्यघटना ही देशाच्या नवीनतम व सर्वांगीन विकासाचा पाया असल्याची प्रतिपादन ॲड . बाळासाहेब आंबेडकर यांनी केले ते दि बेरार जनरल एज्युकेशन सोसायटी द्वारा संचालित सीताबाई कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयात अर्थशास्त्र विभाग व इंग्रजी विभागाद्वारा आयोजित भारतीय राज्यघटना: देशाच्या सर्वांगिन विकासाचा पाया या विषयावर आयोजित एक दिवसीय बहु शाखीय राष्ट्रीय परिषदेमध्ये बीज भाषक म्हणून बोलत होते. यावेळी विचार मंचावर अध्यक्ष म्हणून दि . बी .जी.ई सोसायटी चे अध्यक्ष ॲड. मोतीसिहजी मोहता, तर पहुणे म्हणुन मानद सचिव डॉ पवनजी माहेश्वरी, दी बि जि ई सोसायटीचे माजी अध्यक्ष डॉ . आर.बी.हेडा, दि . बी.जी.ई सोसायटीचे माजी उपाध्यक्ष डॉ. एन. के . माहेश्वरी, महाविद्यालयाचे प्राचार्य आर.डी.सिकची, डॉ . राय, डॉ . जी. जी . गोंडाने, डॉ . आर . डी . चंद्रवंशी, आयोजन सचिव डॉ. प्रसन्नजीत गवई, डॉ .भारती पटनायक, डॉ .ज्ञानशील खंडेराव उपस्थित होते .पुढे बोलताना ॲड .बाळासाहेब आंबेडकर यांनी आणीबाणीच्या काळात सुद्धा मूलभूत हक्काचे संरक्षण हे राज्यघटनेनीच केले असे सांगितले. त्यांनी भारताच्या विकासाच्या दृष्टीने एक धोका विशद केला तो म्हणजे विदेशात गेलेल्या भारतीयांना आता शक्तीने परत भारतात पाठवण्याची कार्यवाही सुरू होईल जे भारताच्या विकासाला मारक असेल त्याकरिता राज्यकर्त्यांनी एक धोरण ठरवले पाहिजे असे सुद्धा त्यांनी सुचित केले. पुढे बोलताना ते म्हणाले की आता जमिनी जिंकुन राज्य मिळविण्याचे दिवस गेलेत आता अर्थव्यवस्था जिंकुन देश आपल्या ताब्यात घेण्याचे दिवस आहे त्यादृष्टीने भारतातील धोरण हे सर्वव्यापी असावे. मानवाला सर्व काही मिळवूनही तो संतुष्ट नाही, कारण त्याला अधिक मिळवायची हाव निर्माण झाली. आजची तरुण पिढी ही आत्मकेंद्रित झाली त्यांनी स्वतःचा विचार न करता समाजाचा व राष्ट्राचा डोळसपणाने विचार करायला हवा तरच या देशाचा सर्वांगीण विकास होईल शेवटी राज्यघटनेने आपल्याला दिलेले सार्वभौमत्वच देशाच्या विकासाचा पाया आहे असे मत व्यक्त केले. यावेळी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ आर. डी. सिकची यांनी ॲड. बाळासाहेब आंबेडकर यांच्या जीवन संघर्षावर व कार्यावर आधारित मानपत्राचे वाचन करून ते एडवोकेट बाळासाहेब आंबेडकर यांना अर्पण केले. आपल्या अध्यक्षीय भाषणात ॲड. मोतीसिंहजी मोहता यांनी जगातल्या सर्वात मोठ्या लोकसंख्येच्या देशाला जगातल्या सर्वोत्तम अशा राज्यघटनेने एकत्रित ठेवले असून आपण सर्वांनी भारतीय राज्यघटनेनुसार वागले पाहिजे असे मत व्यक्त केले. या उद्घाटनिय कार्यक्रमाचे बहारदार संचालन अर्थशास्त्र विभाग प्रमुख तथा आयोजन सचिव डॉ. प्रसन्नजीत गवई यांनी केले, प्रस्ताविक मराठी विभाग प्रमुख डॉक्टर कैलास वानखडे यांनी तर आभार इंग्रजी विभाग प्रमुख डॉ. भारती पटनायक यांनी मानले. उपस्थित सर्व पाहुण्यांचा भारतीय राज्यघटनेच्या उद्देशपत्रिकेची प्रत देऊन सत्कार करण्यात आला. त्यानंतर प्रथम सत्रात अध्यक्ष म्हणून राज्यशास्त्र विभाग प्रमुख प्राध्यापक सुभाष दामोदर तर द्वितीय सत्राचे अध्यक्ष म्हणून यशवंतराव चव्हाण कनिष्ठ महाविद्यालय वाशीम चे प्राचार्य डॉ संतोष पेठे हे तर साधन व्यक्ती म्हणुन यशवंतराव महविद्यालय सेलू जिल्हा वर्धा चे प्राचार्य डॉ. संदीप काळे उपस्थित होते.
या दोन्हीही अभ्यासपूर्ण सत्रात एकूण 37 संशोधक व प्राध्यापकांनी आपले शोध निबंध सादर केले. पहिल्या सत्राचे संचालन प्रा. प्राची काळे यांनी केले तर आभार प्रा. दिपाली सोसे यांनी मानले.
द्वितीय सत्राचे संचालन प्रा. सीमा चिमणकर यांनी केले. तर आभार प्रा. समीक्षा तेलगोटे यांनी मानले.
दी. बी. जी. ई. सोसायटीचे माजी अध्यक्ष डॉ. आर. बी. हेडा यांच्या अध्यक्षतेखाली पार पडलेल्या समारोपीय कार्यक्रमात त्यांनी अशा ज्वलंत विषयावर परिषद होणे काळाची गरज असल्याची प्रतिपादन केले. समारोपीय समारंभाचे प्रस्ताविक महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. आर. डी. सिकची यांनी तर संचालन डॉ. मनीषा कांबळे यांनी तर आभार आयोजन सचिव डॉ. ज्ञानशील खंडेराव यांनी मानले. सदर परिषदेमध्ये देशभरातून एकूण 171 संशोधक व प्राध्यापकांनी आपले शोधनिबंध सादर केले ते अजिंठा या नामांकित जनरल मध्ये एकूण सहा भागात प्रकाशित करण्यात आले त्याचे उपस्थित सर्व पाहुण्यांच्या हस्ते प्रकाशन करण्यात आले. यावेळी महाविद्यालयातील सर्व विभाग प्रमुख, प्राध्यापक मंडळी तथा विविध महाविद्यलयातुन आलेले प्राध्यपक, सर्व अभ्यासक तसेच विद्यार्थी व विद्यार्थीनी मोठ्यासंखेने उपस्थित होते.

