मनोज बिरादार ग्रामीण प्रतिनिधी नांदेड
देगलूर -मन्याड नदीच्या कडेवर वसलेले वझरगा, तुपशेळगाव, आणि गळेगाव या तिन गावचे शिवार आहे. यामध्ये शेकडो एकर जमीन प्रभावीत होत असते. मात्र लगतच्या वसलेल्या तिन्ही गावातील शेतकऱ्यांना आपल्या शेतात जाण्यासाठी मन्याड नदीला ओलांडून जावे लागते. ज्यामध्ये शेतकऱ्यांना आपला जीव धोक्यात घालून प्रवास करावा लागतो आहे. अशावेळी पान्याचा प्रवाह अचानकपणे वाढल्यास शेतकऱ्यांचा जीव गेल्याशिवाय राहणार नाही. या गंभीर मुद्द्याला अनुसरूनच गेल्या अनेक वर्षापासून वझरगा येथील शेतकरी प्रशासन तथा लोकप्रतिनिधीना सतत पाठपुरावा चालू ठेवला होता . याच अनुषंगाने संबंधित विषयाची गांभीर्याने दखल घेत नवनियुक्त जिल्हाधिकारी राहुल कर्डिले हे आपला पहिला दौरा थेट वझरगा येथील मन्याड नदीवर भेट देऊन सुरुवात केला आहे. ग्रामीण भागातील पहिला दौरा थेट शेतकऱ्यांसाठी झाल्याने जिल्हाधिकारी राहुल कर्डिले यांचे सर्वच स्तरातून कौतुक होत आहे. शिवाय जीवघेणं अवस्थेतून आपली सुटका होणाऱ या आशेने शेतकऱ्यांनीही श्वास मोकळा केला.

