मारोती एडकेवार सर्कल प्रतिनिधी सगरोळी
सगरोळी: जिल्हा प्राथमिक शाळा हिप्परगा थडी, येथे प्रजासत्ताक दिनानिमित्त दि. 5/2/2025 रोजी संध्याकाळी,सांस्कृतिक कार्यक्रम साजरा करण्यात आले.कार्यक्रमाचे अध्यक्ष रहेबर इनामदार सरपंच, व कार्यक्रमाचे आयोजक- शालेय समिती व्यवस्थापन अध्यक्ष सय्यद एजास,उपाध्यक्ष सय्यद उमर शाळेचे मुख्याध्यापक मुत्येपोड सर, कार्यक्रमात विविध धार्मिक, व देश भक्ती वर आधारित, गीतावर चिमुकले विध्यार्थी, त्यांची कला सादर केले. क्रमाचे फळ हा नाटक,खूप मोठ्या उत्साहात विद्यार्थ्यांनी सादर केला, कर्माचे फळ या नाटकाचे दिग्दर्शक व लेखक हिप्परगा थडी प्राथमिक शाळेतीलच शिक्षक आदरणीय नाईक सर, यांनी या नाटकाच्या माध्यमातून वास्तविक ग्रामीण भागातील, एका गरीब कुटुंबाची परिस्थिती व त्यांच्या वरती होणारे अन्याय.अत्यंत वास्तविक सादर केले,क्रमाचे फळ नाटक सादर करण्यात आला सूत्रसंचालन श्री गेंदेवार सर यांनी केले सरपंच इनामदार रहेबर,मा सरपंच साहेबराव आंजनिकर, मा सरपंच मियाँ पटेल,यांनी मनोगत व्यक्त केले गावातील प्रमुख पाहुणे म्हणून पोलीस पाटील व तंटामुक्ती अध्यक्ष,आजी माजी ग्रामपंचायत सदस्य, सरपंच उपसरपंच, शिक्षण प्रेमी व विद्यार्थ्यांचे पालक,व महिला भगिनी खूप मोठ्या प्रमाणे उपस्थित होते. कार्यक्रमात आभार प्रदर्शन,श्री गायकवाड सर यांनी केले.

