मनोज भगत
ग्रामीण प्रतिनिधी तेल्हारा
तेल्हारा दि:- या काही वर्षांमध्ये तेल्हारा शहराचे रूप पालटत असून आमदार प्रकाश भारसाकळे यांच्या नेतृत्वात शहराचा झपाट्याने विकास होत अशे यामध्ये जगद्गुरु संत तुकाराम महाराज चौक सौंदरीकरण देहू नंतर तेल्हाऱ्यात साकारल्या जात असल्याचे प्रतिपादन राज्याचे कामगार मंत्री तथा अकोला जिल्ह्याचे पालकमंत्री ऍड. आकाश दादा फुंडकर यांनी जगद्गुरु संत तुकाराम महाराज जयंती महोत्सवानिमित्त तेल्हारा येथे संत तुकाराम महाराज चौक लोकार्पण सोहळा निमित्त कुणबी युवक संघटना तालुका व शहराच्या वतीने आयोजित कार्यक्रमात उद्घाटन पर भाषणात केले केले.
कुणबी युवक संघटनेच्या वतीने तेल्हारा शहरामध्ये दरवर्षीप्रमाणे या वर्षी सुद्धा जगद्गुरु संत तुकाराम महाराज जयंती महोत्सव उत्साहात साजरा करण्यात आला यामध्ये संत तुकाराम महाराज चौक लोकार्पण सोहळा सुद्धा घेण्यात आला असून त्यामध्ये आकाश दादा फुंडकर आपल्या उद्घाटन पर भाषणात पुढे म्हणाले की या शहरावर भाऊसाहेब फुंडकर यांचे नितांत प्रेम होते आणि मी सुद्धा त्यांच्या मार्गदर्शनामध्ये काम करीत असताना अनेकांशी माझे स्नेहाचे संबंध आहेत असे ते म्हणाले. आयोजित कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी आ. प्रकाश भारसाकळे होते तर प्रमुख अतिथी म्हणून माजी मंत्री आ. संजय कुटे माजी आमदार नारायणराव गव्हाणकर भाजपा प्रदेश उपाध्यक्ष अनिल गावंडे तेल्हारा पालिकेचे मुख्याधिकारी सतीश गावंडे शुकदास गाडेकर महाराज माजी जि. प.सदस्य संध्याताई वाघोडे शोभाताई शेळके सुनील फाटकर गोपाल दातकर प्रदीप वानखडे अनंत अवचार माजी न.प.अध्यक्ष सुमित्राबाई ठाकरे कान्होपात्रा फाटकर जयश्री पुंडकर मा.न.प.सदस्य भागीरथीबाई मामनकार वंदना लासुरकर सुचिताताई तायडे सुनिता ठोकणे श्रीराम टोहरे कैलास ठोकणे रामभाऊ फाटकर अरुणाताई ठाकरे आरतीताई गायकवाड ,गजाननराव नळकांडे आदी मान्यवर उपस्थित होते. 2 फेब्रुवारीला सकाळी महाआरती ज्येष्ठ नागरिकांचा सत्कार व 21 रक्तदात्यांनी रक्तदान केले कार्यक्रमाचे सूत्रसंचालन उज्वल दबडघाव सर व बंटी राऊत यांनी केले तर आभार प्रदर्शन गजानन गायकवाड यांनी केले कार्यक्रमाचे भव्य दिव्य स्वरूप पाहता संपूर्ण सोहळा यशस्वी करण्याकरिता कुणबी युवक संघटनेचे तालुकाध्यक्ष ज्ञानेश्वर बाहकर शहर अध्यक्ष विठ्ठलराव मामनकार महिला संघटना तालुका अध्यक्ष प्रतिभाताई वाकोडे शहराध्यक्ष साधनाताई माहोकार तसेच कुणबी युवक संघटनेच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी अथक परिश्रम घेतले
////?/??/?/// /////// //////
शहराचा बायपासचा प्रश्न लवकरच मार्गी लावू
आ. प्रकाश भारसाकळे
तेल्हारा शहरातून जाणारा रस्ता अडचणीचा होत आहे याकरिता शासन स्तरावर प्रयत्न चालू असून तसा प्रस्ताव सुद्धा सादर करण्यात आला आहे त्यामुळे शहराचा बायपासचा प्रश्न लवकरच मार्गी लावू तसेच छत्रपती शिवाजी महाराज पुतळ्याजवळ सौंदरीकरण करू शहराच्या सर्वांगीण विकासासाठी प्रयत्न करीत असून मतदार संघाच्या विकासासाठी पालकमंत्री आकाश दादा फुंडकर यांचे सुद्धा सहकार्य लाभणार आहे असे प्रतिपादन आ. प्रकाश भासाकळे यांनी आपल्या अध्यक्षीय भाषणातून केले.
///////////// ///////////
प्रशासनाच्या कारकिर्दीत शहराचा विकास झाला.
आ.संजय कुटे
जगद्गुरु संत तुकाराम महाराज सौदरीकरनाचे काम उत्कृष्टपणे करण्यात आल्याबद्दल समाधानी असून काही गोष्टी प्रशासनाच्या कारकिर्दीत जलद गतीने होत असल्याचे प्रतिपादन आमदार संजय कुटे यांनी केले तसेच अकोट मतदार संघामध्ये सतत निवडून येण्याची परंपरा नव्हती परंतु ती परंपरा खंडित करून सतत तीन वेळा निवडून येण्याची किमया आ. प्रकाश भारसाकळे यांनी करून दाखविल्याचे आ. कुटे यांनी सांगितले.
///////////////////-//–//////
संत तुकाराम महाराजांचे विचार आत्मसात करून मार्गक्रमण करा..
मा.आ. नारायणराव चव्हाणकर
जगद्गुरु संत तुकाराम महाराजांच्या जयंती उत्सवाचा कार्यक्रम “कुणबी युवक संघटनेच्या वतीने दरवर्षी मोठ्या उत्साहात साजरा करण्यात येत आहे या उत्सवा दरम्यान भाविक भक्तांनी जगद्गुरु संत तुकाराम महाराजांचे विचार आत्मसात करून मार्गक्रमण करावे असे प्रतिपादन माजी आ. नारायणराव गव्हाणकर यांनी केले.
///////////////////////—/^^^
सर्वांना विश्वासात घेऊन सौंदर्यकरणाचे काम पूर्ण केले.
मुख्याधिकारी सतीश गावंडे
जगद्गुरु संत तुकाराम महाराज सौंदरीकरनाचे काम एक बाजूला होते ते मुख्य रस्त्याच्या मध्यभागी घेऊन चौक सौदरींकरणामध्ये भर टाकण्याचे काम आ. प्रकाश भारसाकळे यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आले असून उर्वरित विकासाचे प्रश्न सुद्धा त्यांच्या सहकार्याने मार्गी लावू असे मुख्याधिकारी व प्रशासक सतीश गावंडे यांनी सांगितले.
/////////////-///////////—///
चौकाला संत तुकाराम महाराजांचे नाव देण्यासाठी पुढाकार घेणाऱ्या फाटकरांचा पालकमंत्र्यांनी केला सत्कार.
तेल्हारा शहराच्या मध्यभागी असलेल्या चौकाला काही वर्षांपूर्वी मानकर चौक म्हणून संबोधले जात होते परंतु ते नाव अधिकृत नसल्यामुळे या चौकाला जगद्गुरु संत तुकाराम महाराज नाव देण्यासाठी व तिथे मोठ्या प्रमाणात सौंदरीकर्ण करण्याचे काम करण्यासाठी तेल्हारा पालिकेच्या माजी नगराध्यक्ष सौ.कान्होपात्रा रामभाऊ फाटकर व माझी न.प. सदस्य रामभाऊ फाटकर यांनी अनेकांच्या तक्रारीला व विरोधाला न जुमानता अधिकारी व सहकार्यांना विश्वासात घेऊन जगद्गुरु संत तुकाराम महाराज चौक सौंदरीकरणाचे काम पूर्ण केल्यामुळे आयोजित कार्यक्रमांमध्ये पालकमंत्री आकाशदादा फुंडकर व आ. प्रकाश भारसाकळे, आ. संजय कुटे यांनी रामभाऊ फा1टकर यांचा सत्कार केला.
/////////-/////////// //////////
युवकांनो व्यसनमुक्ती कडे वळा..
सोपान महाराज कनेरकर ….
आजचा युवक भरकटत चालला असून युवकांनो व्यसनाधीनताकडे न वडता व्यसनमुक्ती कडे वळा आणि चांगले आरोग्य जगा व देव देशासाठी व धर्मासाठी जगा हीच जगण्याची परिभाषा असून कीर्तनातून परिवर्तन झाले पाहिजे अन्यथा कीर्तनाला महत्त्व राहणार नाही.मित्र कसा असावा यासाठी सोपान महाराज कनेरकर यांनी अनेक दाखले दिले अशा प्रकारचे अनेक दाखले देत सोपान महाराज कनेरकर यांनी श्रोत्यांचे मने जिंकली कुणबी युवक संघटनेच्या वतीने आयोजित कीर्तन सोहळ्याला हजारो भाविक भक्ता मोठ्या संख्येने उपस्थित होते यावेळी मंचावर टाळ मृदंग गावक व अनेक गावचे टाळकरी मंडळी उपस्थित होते किर्तन सोहळा व लोकार्पण सोहळा यशस्वी करण्याकरिता नगरपालिका प्रशासन व कुणबी युवक संघटनेच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी अथक परिश्रम घेतले किर्तन सोहळ्या करिता आयोजित कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन मंगेश ठाकरे यांनी केले.
//// // — -///////