माजी शिक्षक आ. नागो गाणार यांची ग्वाही
मारोती बारसागडे
जिल्हा प्रतिनिधी गडचिरोली
गडचिरोली :-शिक्षकहित, शिक्षणहित व राष्ट्रहित हेच माझे ध्येय असून,शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांवर होणाऱ्या अन्यायाविरुद्ध सतत लढा देणार असल्याची ग्वाही नागपूर विभागाचे माजी शिक्षक आ. नागो गाणार यांनी दिली आहे.
महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषद जिल्हा शाखा गडचिरोलीच्या वतीने १ ते २ फेब्रुवारी पर्यंत दोन दिवसीय ३१ वे जिल्हा अधिवेशन चपराळा येथील हनुमान मंदिर प्रशांत धाम परिसरात पार पडले त्यावेळी ते मुख्य मार्गदर्शक म्हणून बोलत होते. धैर्य, हिम्मत, सहनशीलता व महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषद संघटनेवर विश्वास ठेवून कार्य केले तर न्याय हमखास मिळेलच सर्व कर्मचाऱ्यांच्या भविष्यासाठी जुनी पेन्शन योजना किती महत्त्वाची आहे. हे स्पष्ट करून ओपीएस डीसीपीएस आणि यूपीएस मधील बारकावे, आश्वासित प्रगती योजना १०,२०,३०. राष्ट्रीय शैक्षणिक धोरण २०२०, सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांची समस्या, शालेय स्तरापासून शिक्षणाधिकारी कार्यालयापर्यंत होणारे भ्रष्टाचार, तथा काही संस्था चालक व काही मुख्याध्यापकांद्वारे शिक्षकांच्या वेतनातुन दर महिन्याला होणाऱ्या खंडणी इत्यादी विविध विषयांवर चिंतन, समस्या व उपाय यावर नागो गानार यांनी सखोल मार्गदर्शन केले.
अधिवेशनाच्या पहिल्या दिवशी कार्यकर्ता जडणघडणीचे मुलमंत्र या विषयावर जिल्हा कार्यवाह अविनाश तलापल्लीवार राष्ट्रीय स्वयंसेवक संघ जिल्हा गडचिरोली व चामोर्शी तालुका संघचालक नंदकिशोर ओलालवार यांनी मार्गदर्शन केले तर नागो गाणार यांनी पेन्शन योजना या विषावर चर्चा करून उपस्थितांच्या समस्यांचे निराकरण केले सत्राचे अध्यक्ष महेश तुमपल्लीवार यांनीही मार्गदर्शन केले कार्यक्रमाचे नागपूर विभागाचे कोषाध्यक्ष संतोष सुरावार यांनी अधिवेशन का व कशासाठी घेण्यात आले त्याबद्दल सविस्तर माहिती प्रास्ताविकातून दिली
अधिवेशनाला उपस्थित पाहुणे व सेवानिवृत्त पदाधिकाऱ्यांचा भारताचे संविधान पुस्तक, शाल श्रीफळ व सन्मान चिन्ह देऊन सत्कार करण्यात आला. दुसऱ्या सत्राचे अध्यक्ष शिक्षक परिषदेचे जिल्हाअध्यक्ष अनिल नुतीलकंठावार हे होते संचालन विश्वजीत लोणारे यांनी केले.
कार्यक्रमाचे स्वागताध्यक्ष माजी आमदार डॉ देवराव होळी यांनी महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषद ही नेहमीच शिक्षकहीत, समाजहित व देश हिताच्या दृष्टीने काम करणारी संघटना असल्याचे सांगितले दुसऱ्या सत्रात राष्ट्रीय शैक्षणिक धोरण २०२० या विषयावर पूजा चौधरी व रंजनाताई कावळे यांनी राष्ट्रीय शैक्षणिक धोरण २०२० प्रत्यक्ष शाळेत राबवतांना खाजगी शाळांना येणाऱ्या अडचणी विषयी संघटनेचे विचार स्पष्ट केले.अधिवेशनाला महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषदेचे नागपूर विभाग अध्यक्ष अजय वानखेडे, कार्यवाह सुभाष गोतमारे, विभाग कोषाध्यक्ष संतोष सुरावार, रामदासजी गिरडकर, घनश्यामन मनबत्तुलवार, मृणाल तुम्पलीवार, नागपूर विभागाचे सुधीर वारकर, संतोष जोशी, दिलीप तायडे, सागर आडे,मनोज बोमनवार, रहेजा,गणेश तगरे,चंद्रकांत बुरांडे, विजय साळवे,अतुल सुरजागडे,संजय हिचामी,कु. कल्पना खेडुलकर,आरती बंडावार, समीक्षा सुरावार, ज्योती जिचकार,जुमनाके, सुनंदा गलबले,उषा बोकडे, स्वाती निवाडे.साईनाथ पेदोंर,रुपेश बुरमवार, बामनकर, नारायण सालुरकर,जनार्धन मस्के, यशवंत आभारे, गुरुदेव चापले,दिलीप राय.सुरेश लुटे, संतोष रचावार तसेच जिल्हा व तालुका पदाधिकारी, शिक्षक व शिक्षकेत्तकर कर्मचारी मोठ्या संख्येत उपस्थित होते. उपस्थितांचे आभार जगदीश केळझरकर यांनी मानले