तारा पाटील
पालघर जिल्हा प्रतिनिधी पालघर
पालघर : वरिष्ठ पत्रकार अध्यक्ष रामप्रकाश निराला यांच्या वाढदिवसानिमित्त चला गावाकडे कार्यक्रम पत्रकार संघटना बोईसर – पालघर पत्रकार संघटना ( रजि. ) पत्रकारितेच्या बरोबर सामाजिक सुप्रसिद्ध कार्याचे औचित्य साधून पत्रकार संघाना बोईसर- पालघर यांनी वाढदिवसाच्या दिवशी १ फेब्रुवारी २०२५ रोजी पत्रकार संघाचे अध्यक्ष रामप्रकाश निराला यांचा ६५ वा वाढदिवस हाॅटेल सम्राट चित्रालय बोईसर येथे केक कापून, पुष्पगुच्छ व भेटवस्तू देऊन साजरा करण्यात आला. तारापूर येथील शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आलेल्या गरजू गरिब रूग्णांना फल, खाद्य पदार्थ देऊन त्यानंतर सर्व पत्रकार सदस्य संतोषी माता मंदिर आशागड डहाणू येथे दर्शन घेऊन महालक्ष्मी माता मंदिर विवलेवेढा येथे जाऊन महालक्ष्मी मातेचे दर्शन घेतले. तेथील गरजू गरिब लोकांना व बायकांना साड्या व थंडीत उब देण्यासाठी ब्लँकेट वाटप करण्यात आले तसेच खाद्यपदार्थ देण्यात आले. पत्रकार संघटनेचे उपाध्यक्ष भूपनारायण शुक्ला व प्रवीण पाटील, महासचिव मोहन म्हात्रे, सचिव अजित सिंह, दिपक निराला, कार्यकारी संचालक, मृत्युंजय पाण्डेय, व सदस्या संगीता शाह, समाजसेवक मोईज शेख तसेच सर्व पत्रकार संघाचे सदस्य उपस्थित होते. रामप्रकाश निराला यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देण्यासाठी काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष नेता प्रफुल्ल पाटील, भाजपाचे बलवंत गावीत, कँग्रेसचे अविनाश राऊत , मधुकर चौधरी, रोशन पाटील, सह अनेक नेते उपस्थित होते. वरिष्ठ अध्यक्ष रामप्रकाश निराला यांना वाढदिवसानिमित्त शुभेच्छा देण्यासाठी पत्रकार सदस्य तसेच समाज सेवक मोठ्या प्रमाणात उपस्थित होते.