विश्वास काळे उप जिल्हा प्रतिनिधी यवतमाळ
उमरखेड : इसापूर धरणाचे पाणी पैनगंगा पात्रात व कॅनॉल व्दारे सोडण्याचे योग्य नियोजन नसल्याने हिवाळ्यातच पैनगंगा आटल्याने नदीकाठच्या गावांना पाणीपंचायत सामना करावा लागतो तसेच शेतकऱ्यांना सिंचनासाठी पाणी नसल्याने पिकांचे अतोनात नुकसान होते .पशुधनाची ही पाण्यावाचून तडफड होते .प्रशासनाकडून धरणाच्या पाणी पाळीचे योग्य नियोजन नसल्याने दरवर्षी नदीकाठच्या शेतकऱ्यांचे पाणी टंचाईमुळे बेहाल होतात त्यामुळे ईसापुर धरणाचे पाणी पैनगंगा पात्रात योग्य नियोजन करून सोडण्यात यावे ,हा शेतकऱ्यांच्या जिव्हाळ्याचा मुद्दा नवनिर्वाचित आमदार किसनराव वानखेडे यांनी विधानसभेत उपस्थित केला आहे तालुक्यातून वाहणाऱ्या पैनगंगा नदी पात्रात ईसापुर धरणाचे पाणी सोडण्याचे प्रशासनाकडून योग्य नियोजन होत नसल्याने नदीकाठावरील व आसपासच्या गावांमध्ये हिवाळ्यापासूनच पिण्याच्या पाण्याची टंचाई निर्माण होते .हिवाळ्यापासूनच खेडेगावात नागरिकांना पिण्याच्या पाण्याचे दुर्भिक्ष होत असल्याने नागरिक पाणीटंचाईमुळे हैरान होतात ,शेतातील ऊस यासह रब्बी पिके वाळून जातात ,पशुधनही पाण्यावाचून तडफडत राहते , ही परिस्थिती मागील वर्षी भाजपाचा एक सामान्य कार्यकर्ता म्हणून त्यांनी आपल्या कार्यकर्त्यांसह नदीकाठावरीलगावामध्ये जाऊन वाळलेल्या पिकांची पाहणी केली होती त्यावरून त्यांनी आज दिनांक १७ डिसेंबर रोजी विधानसभेतील अधिवेशनाच्या दुसऱ्या दिवशी त्यांनी शेतकऱ्यांच् जिव्हाळ्याच्या यामुद्द्यापासूनचआपल्यापंचवार्षिक कार्य काळाचा प्रारंभ केला आहे .








