संतोष भवर शहर प्रतिनिधी अंबड
काही दिसांपूर्वीच काम चालू केतं पूर्ण डोंगराच्या पथ मार्गाचे काम सदरील गुत्तेदाराद्वारे सुरू करण्यात आले आहे. डोंगराच्या पाठीमागील नगरपालिका अग्निशामक दल पर्यंत पथमार्गाचे खोदकाम झाले आहे. पण डोंगराच्या पाठीमागच्या बाजूला काही. त्या अतिक्रमण धारकाचे म्हणणे आहे , “तुमचा पथ मार्ग झाल्यास आमच्या घरात पाणी जाईल” आणि काही अतिक्रमण धारकांचे घर असल्यामुळे पथमार्गाचे काम बंद केले आहे. याची माहिती संस्थान अध्यक्ष तथा तहसीलदार श्री विजय चव्हाण आणि सचिव नायब तहसीलदार श्री महेंद्र गिरगे यांना कळविण्यात आले. त्यांनी दिनांक 3/12/2024 रोजी संपूर्ण डोंगराला प्रदक्षिणा घातली व त्यांच्या निदर्शनास आले. यावेळी संस्थांन अध्यक्ष तथा तहसीलदार श्री विजय चव्हाण यांनी जे अतिक्रमण करणारे या पथ मार्गाचे कामात अडथळा आणण्याचा त्याच्यावर कारवाई करून पोलीस बंदोबस्त मध्ये अतिक्रमण काढण्यात येईल व सरकारी कामास अडथळा आणल्यास त्यावर कायदेशीर कारवाही करण्यात येईल व त्याच्याकडे अतिक्रमण धारका असल्याचा काय रेकॉर्ड आहे, त्यांनी तहसील कार्यालयात दाखल करावे. यावेळी संस्थान सचिव तथा नायब तहसीलदार श्री महेंद्र गिरगे, संस्थान विश्वस्त पुजारी श्री गीताविलास कुंठेफळकर, संस्थान व्यवस्थापक श्री कैलास शिंदे व संस्थान कर्मचारी उपस्थित होते.