महेश निमसटकर तालुका प्रतिनिधि भद्रावती
भद्रावती दि.3 :- जिल्हा समाज कल्याण अधिकारी जि.प. चंदपूर सुरेश पेंदाम व विस्तार अधिकारी ताराचंद खानेकर यांच्या पत्नीक सत्कार सोहळा संताजी जगणाडे महाराज सामाजिक सभागृह चंदपूर येथे घेण्यात आला. यावेळी अधीक्षक शेंडे यांच्या अध्यक्षतेखाली तर अनुदानित वस्तीगृह कर्मचारी संघटनेचे अध्यक्ष राजू पेंटकर सचिव प्रबोधन भगत व संघटनेचे सर्व पदाधिकारी यांच्या प्रमुख उपस्थितीत शाल श्रीफळ साडीचोळी देऊन करण्यात आला. याप्रसंगी महादेव पुनवटकर म्हणाले की, पेंदाम साहेब शांत स्वभावी व पूर्णवेळ आनंदित राहून काम करणारे अधिकारी होते. कोणत्याही वस्तीगृहावर अन्याय होणार नाही. वस्तीगृहाला अडचण भासू नये, यांची त्यांनी दखल घेतली प्रशासकीय कार्यात अत्यंत शिस्तबद्ध होते. त्यांनी गडचिरोली व चंद्रपूर जिल्ह्यात सेवा दिली. त्यांचे पुढील आयुष्य सुख समाधानाचे जावो अशा शुभेच्छा दिल्या. याप्रसंगी शेंडे, भाऊ कुनघाटकर, आशा पडाले, अमोल चिडमलवार,सहायक लेखा अधिकारी यांनी आपले मनोगत व्यक्त केले. तसेच खानेकर यांचीही कामगिरी अत्यंत शिस्तबद्ध होती. तेही प्रेमळ व शांत स्वभावाचे होते असे ते म्हणाले, याप्रसंगी सुरेश पेंदाम हे सत्काराला उत्तर देताना म्हणाले की, माझे कालावधीत कोणत्याही वस्तीगृहाचे नुकसान होणार नाही याची दखल घेतली. वस्तीगृहाचा दर्जा कसा सुधारेल याच्याकडे विशेष लक्ष दिले. कारण वस्तीगृहामध्ये ग्रामीण भागातील मुले-मुली शिकायला येतात त्यांना दोन वेळचे जेवण व राहण्याची उत्तम व्यवस्था मिळावी अधिकारी या नात्याने माझे कर्तव्य होते. सत्काराला उत्तर देताना भारावून गेले. तसेच विस्तार अधिकारी खानेकर यांनी सत्काराला उत्तर देताना वेळोवेळी संघटनेच्या पदाधिकाऱ्यांना काही वस्तीगृहा बद्दल माझी गरज भासल्यास मी नक्की आपणास मदत करील असे ते म्हणाले. याप्रसंगी त्यांचे कुटुंबीय सदस्य आवर्जून उपस्थित होते.


