कैलास खोट्टे जिल्हा प्रतिनिधी बुलढाणा
संग्रामपूर तालुक्यातील सोनाळा येथील दिनांक 6 नोव्हेंबर रोजी संत नगरी सोनाळा येथे होणाऱ्या श्री संत सोनाजी महाराज यात्रा महोत्सवामध्ये ग्रामपंचायत कार्यालयासमोर रथाजवळ सरकारी दवाखाना तसेच डॉक्टर व नर्ससह तुकडी यात्रा महोत्सव काळात भक्तांच्या यात्रेकरूंच्या आरोग्याची देखभाल करण्याकरिता दिनांक 16 नोव्हेंबर पासून ते 19 नोव्हेंबर पर्यंत उपलब्ध करून देण्यात यावे असे निवेदन सोनाजी महाराज स्वयंसेवक यांनी प्राथमिक आरोग्य केंद्र सोनाळा यांना दिले.यावर्षी होत असलेल्या यात्रा महोत्सवामध्ये थंडी,खोकला सर्दी,हिवताप याचा प्रादुर्भाव वातावरण बदलामुळे खूप मोठ्या प्रमाणात वाढल्याचे चित्र दिसत आहे त्यामुळे यात्रेकरूंची गैरसोय होऊ नये म्हणून स्वयंसेवकांनी आपल्या गावातील आरोग्य केंद्रात गोळ्या व औषधी सह एका चमूची आवश्यकता असण्याचे दर्शविले.