सुमेध दामधर ग्रामीण प्रतिनिधी संग्रामपूर
सोनाळा :- महाविकास आघाडीच्या उमेदवार सौ. डॉ. स्वातीताई संदीप वाकेकर यांनी पाच नोव्हेंबर रोजी महासिद्ध महाराज धानोरा यांच्या चरणी प्रचाराचे नारळ फोडून सुरुवात केली. त्यांच्या या प्रचार दौऱ्यामध्ये खेड्यापाड्यात ज्येष्ठ नागरिकांकडून, युवक, महिला व मतदारांकडून उस्फुर्त असा प्रचंड प्रतिसाद मिळत आहे. त्यांच्या प्रचार संग्रामपूर तालुक्यातील सोनाळा येथे श्री संत सोनाजी महाराज मंदिरामध्ये सुद्धा प्रचाराची नारळ फोडले. ग्रामदैवत असलेले श्री संत सोनाजी महाराज यांचे पूजन करून त्यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यांचे वंदन करून त्यांनी युवकांच्या बेरोजगारींचा फार मोठा प्रश्न सोडवण्यासाठी छोटे आणि मोठ्या उद्योगधंद्याची निर्मिती होणे गरजेचे आहे. त्यासाठी जळगाव जामोद मतदारसंघाचा कायापालट जर करायचा असेल व महिला बचत गटाच्या माध्यमातून महिलांना जे प्रॉडक्ट बाजारपेठेत उपलब्ध करून द्यायचे असेल तर खऱ्या अर्थाने मातृत्व जिल्ह्यामध्ये समीक्षीकरण करणं त्यांचा सन्मान करणं आणि त्याचबरोबर शेतकऱ्यांच्या साठी एक मोठा साखर कारखाना किंवा त्यांच्या कृषी मालावर प्रक्रिया उद्योग निर्माण करून त्यांना चांगल्या पद्धतीचा भाव मिळाला पाहिजे रखडलेले सिंचनाचे प्रकल्प पूर्णत्वास घेऊन जळगाव जामोद मतदारसंघ सुजलाम सुफलाम करणे हाच महाविकास आघाडी आणि मित्र पक्षांचा सर्वात महत्त्वाचा जाहीरनामा आहे. असे त्यांनी यावेळी सांगितले. यावेळी गावातील श्री अनंता उर्फ नरसिंम्हा पिंजरकर यांनी डॉ. स्वातीताई वाकेकर, महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे सचिव रामविजय बुरुंगले, बुलढाणा जि. प. मा. अध्यक्ष प्रकाशभाऊ पाटील, संग्रामपूर तालुका काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष राजेंद्र वानखडे, सोनाळा शहर कमिटीचे अध्यक्ष अजय अग्रवाल, युवक कार्यकर्ता शंकरनाथ विश्वकर्मा, शोशल मीडियाचे जिल्हा उपाध्यक्ष स्वप्निल बापू देशमुख, श्री पांडव सर, प्रकाश बाप्पू देशमुख जेष्ठ कार्यकर्ते सोनाळा सह असंख्य कार्यकर्तेच्या उपस्थितीमध्ये जाहीर प्रवेश घेतला. यावेळी शिवसेना राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरद पवार गटाचे माजी जि. प. उपाध्यक्ष संगीतराव उर्फ राजूभाऊ भोंगळ, राजेश दाभाडे, बाळूभाऊ साबे, संजयभाऊ राहणे, सुमेध दामधर, डॉक्टर दाभाडे साहेब, प्रशांत गावंडे, श्रीकृष्ण गावंडे, दामोदरआप्पा घोडेस्वार, अमोलआप्पा घोडेस्वार,ग्रामपंचायत सदस्य मुशिर अली सह असंख्य कार्यकर्ते यावेळी प्रामुख्याने हजर होते.