बद्रीनारायण गलंडे जिल्हा प्रतिनिधी हिंगोली
हिंगोली : हिंगोली तालुक्यातील उपबाजारपेठ असलेल्या कनेरगाव नाका येथे पत्र्याच्या शेडमधून २ लाख ४० हजार रुपये किंमतीचे देशीदारूचे ५० बॉक्स जप्त करण्यात आले. ही कामगिरी स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने केली आहे. या प्रकरणात गुन्हा नोंदविण्यात आला आहे. हिंगोली तालुक्यातील कनेरगाव नाका येथे रोडच्या कडेला असलेल्या पत्र्याच्या शेडमधून 2 लाख ४० हजार किंमतीचे देशीदारूचे ५० बॉक्स जप्त करण्यात आले. या प्रकरणी एका व्यक्ती विरुद्ध बासंबा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. पोलीस महानिरिक्षक यांच्या आदेशाने हिंगोली जिल्हात विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पोलीस विभाग सतर्क झाला असून जिल्हात कोणत्याही ठिकाणी अवैदयरित्या मद्य , रोख रक्कम , भेटवस्तूची वाहतुक होणार नाही. पोलीस अधिक्षक श्रीकृष्ण कोकाटे , अप्पर पोलीस अधिक्षक अर्चना पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली विशेष पथक स्थापन केले आहे. कनेरगाव नाका हे गाव नॅशनल हायवे 161 वर असून मराठवाड़ा विदर्भ सिमेवर आहे. कनेरगाव नाका येथून १ कि.मी अंतरावर चेकपोस्ट आहे. तर दुसरी चेकपोस्ट विदर्भ सिमा राजगाव गावाजवळ २किमी वर आहे. कनेरगाव नाका चौकी या अगोदर गोरेगाव पोलीस स्टेशन अंतर्गत होती. आता १५ ऑगस्ट पासून बासंबा पोलीस स्टेशन अंतर्गत झाली. तेव्हा पासून कनेरगाव नाका हे अवैद्य धंद्याचे माहेर घर झाले असून याकडे ना ठाणेदाराचे लक्ष नाहीच तर चौकीवाल्यांचे सुद्धा नाही. हिंगोली ते वाशिम जिल्हाच्या सिमेवर असलेल्या कनेरगाव नाका चौकीच्या काही अंतरावर मुख्य रस्त्यालगत पत्र्याच्या शेडमध्ये देशी दारूचे बॉक्स लपवून ठेवल्याची माहिती गुन्हे शाखेचे निरिक्षक विकास पाटील यांना मिळाली होती. त्यावरून सहाय्यक पोलीस निरिक्षक शिवसांब घेवारे , उपनिरिक्षक विक्रम विठूबोने , जमादार आझम प्यारेवाले , नितीन गोरे , हरिभाऊ गुंजकर , साईनाथ कंठे , नरेंद्र साळवे , आकाश टापरे , शेख जावेद यांच्या पथकाने दिवाळीच्या धामधुमीत रात्रीच्या सुमारास शोध मोहिम हाती घेतली होती. मुख्य रस्त्या लगत असलेल्या सर्व शेडची पोलीसांनी तपासणी सुरु केली होती. काही तासानंतर एका पत्र्याच्या शेडमध्ये देशी दारुचे बॉक्स आढळून आले. त्याची किंमत २ लाख ४० हजार रुपये एवढी आहे. यानंतर मराठवाडा व विदर्भ असलेल्या जिल्हात खळबळ उडाली. दोन्ही बाँड्रीवर चेकपोस्ट असतांना एवढी मोठी दारू विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आली कोठून यावर आश्चर्य व्यक्त केल्या जात असून चेकपोस्ट व बासंबा पोलीस ठाणे व चौकीला याची माहिती कशी नाही याकडे प्रश्न उपस्थित होत आहे. ही देशीदारू कशासाठी व कोणासाठी आली याची कर्तव्यदक्ष पोलीस अधिक्षक श्रीकृष्ण कोकाटे यांनी लक्ष द्यावे अशी सर्वसामान्य जिल्हातील जनतेची आहे . या देशीदारुकडे राज्य उत्पादन शुल्कने लक्ष देवून देशी दुकानदार लायसन्स यांच्यावर कारवाई करण्यात यावी अशी सर्वसामान्य जनतेची इच्छा आहे. या देशी दारूचे बॅच क्र . पाहून लायसन्स धारक वर कारवाई न करता दुसऱ्यावर कारवाई करण्यात आल्यामुळे पोलीस विभागावर संशय निर्माण होत असून ‘ चोराला सोडून संन्याशाला फाशी ‘ अशी गत होत असल्याची चर्चा आहे. ही धाड पडल्यानंतर माहिती घेण्याच्या प्रयत्न केला असता गुन्हे शाखेचे अधिकारी व कर्मचारी तसेच बासंबा पोलीस ठाण्याचे ठाणेदार व चौकीचे कर्मचारी माहिती देत नव्हते. याची सुद्धा उलटसुलट चर्चा होत आहे. या प्रकरणी जमादार कंठे यांनी दिलेल्या तक्रारी वरून एका विरुद्ध बासंबा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. सहाय्यक पोलीस निरीक्षक हनुमंत भिगारे , सहाय्यक पोलीस उपनिरिक्षक मदन गव्हाणे पुढीस तपास करीत आहेत.