मनोज गवई जिल्हा प्रतिनिधी अमरावती
चांदूर रेल्वे :शहरातील इंदिरा नगर परिसरात परब्रम्ह श्री गणपतेश्वर बाबांचे मंदिर स्थित आहे.वैकुंठ चतुर्दशी च्या दिवशी परम पूज्य बाबांनी देह त्याग केला होता ह्या दिवसाचे महत्व जाणून दिनांक १४ व १५ नोव्हेंबर रोजी बाबांच्या पुण्यतिथी दिनानिमित्य विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात येणार आहे.ह्या कार्यक्रमामध्ये दिनांक १४ नोव्हेंबर रोजी बाबांचा मूर्तीची अभिषेक पूजा, तीर्थस्थापना ,स्वछताआभियान,समुदायिक प्रार्थना व भजनांजली कार्यक्रम आयोजित केलेले आहे.दिनांक १५ नोव्हेंबर रोजी शहरातून भव्य रामधून पालखी सोहळा चे सुद्धा आयोजन केले आहे .दुपारी ह.भ.प.पंकज महाराज पोहोकार यांचे कल्याचे कीर्तन व किर्तना नंतर भव्य महाप्रसाद आयोजित केला आहे. ह्या कार्यक्रमाला समस्त भाविकांनी उपस्थित राहून बाबांच्या दर्शनाचा तसेच महाप्रसादाचा लाभ घ्यावा असे आवाहन आयोजन समिती चे अध्यक्ष शशिकांत वाल्दे व कचरूजी अंभोरे , नारायणराव कपाट , सोहन शर्मा ,भारत तवाडे,अतुल उज्जैनकर व भक्तपरिवाराने केले आहे.