तुकाराम पांचाळ करखेलिकर ग्रामीण प्रतिनिधी धर्माबाद
नांदेड जिल्ह्याचे व राज्याचे लक्ष लागून असलेल्या नायगाव विधानसभा मतदार संघाच्या निवडणुकीच्या रिंगणात तिरंगी लढत नव्हे चौरंगी होणार आहे नायगाव विधानसभा मतदार संघाच्या या सदरच्या रिंगणात महाविकास आघाडीच्या अधिकृत उमेदवार डॉ मीनलताई खतगावकर, महायुतीचे उमेदवार मा. राजेश पवार, तिसरी आघाडीचे प्रहार जनशक्ती पक्षाचे उमेदवार गजानन चव्हाण तर वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार डॉ माधवराव विभुते अशी निवडणुकीच्या रणसंग्रामात लढत होणार आहे नायगाव विधानसभा मतदार संघाच्या निवडणुकी मध्ये दोन डॉक्टर आहेत एक महिला डॉक्टर माजी मंत्री भास्करराव पाटील खतगावकर यांच्या सुनबाई डॉक्टर मीनल ताई खतगावकर तर दुसरे डॉक्टर उमेदवार माधवराव विभुते हे निवडणुकीच्या रिंगणात आहे नायगाव विधानसभा मतदार संघाच्या निवडणुकीला सध्या तरी रंग येत नसला तरी रिंगणातील उमेदवार आपापल्या पद्धतीने मतदारांच्या भेटी घेताना मात्र दिसून येत आहेत महाविकास आघाडीच्या उमेदवार डॉक्टर मीनल ताई खतगावकर महायुतीचे उमेदवार मा.राजेश पवार, परिवर्तन महाशक्ती प्रहार जनशक्ती पक्षाचे उमेदवार गजानन चव्हाण हे सदरच्यावंचित बहुजन आघाडीचे उमेदवार डॉ माधवराव विभुते निवडणुकीच्या रणसंग्राम लंगोट खेचली आहे