शिवाजी शिंदे जिल्हा प्रतिनिधी परभणी
सेलू : जिंतूर सेलू विधानसभा मतदार संघाचे माजी आमदार विजयराव भांबळे यांच्या प्रचारार्थ शुक्रवार दि.08 नोव्हेंबर 2024 रोजी दुपारी 04 वाजता नूतन विद्यालय मैदान सेलू येथे मा.खा.शरदचंद्र पवार यांची सभा आयोजित करण्यात आली आहे. या पार्श्वभूमीवर आज मा.प्रमोदराव भांबळे यांनी या जागेची पाहणी केली आहे. त्यांच्या सोबत जि.प. बांधकाम सभापती अशोक नाना काकडे,राजेंद्र काका लहाने,विनायकराव पावडे,अप्पासाहेब डख, माऊली राऊत,रणजित गजमल,पप्पू गाडेकर, शिवराम कदम,रघुनाथ बागल,संदेश बोराडे,सचिन शिंदे,अक्षय कदम,परवेज सौदागर, मदन पवार,भागवत बालटकर, तौफिक भाई,दत्तराव गायके,संतोष गायके आदीजन उपस्थित होते.









