रविंद्र पवार तालुका प्रतिनिधी शिरुर
सध्या दिवाळीनिमित्त सर्वञ उत्साहाचे वातावरण पाहायला मिळत असुन आकर्षक आकाशकंदील,रांगोळी आणि रोषणाईच्या झगमगाटाने लक्ष वेधुन घेतले आहे. या चालू वर्षीच्या दिवाळी या महत्वपुर्ण सणानिमित्त बहुजन समाज पार्टी शिरूर तालुका व पुणे जिल्ह्याच्या वतीने लोकशाहीचा चौथा आधारस्तंभ असलेल्या पञकार बांधवांना पुण्यभुमी असलेल्या सणसवाडी नगरीमध्ये नुकतेच मिठाईचे वाटप करून पञकार बांधवांना दिवाळीच्या शुभेच्छा देण्यात आल्या आहेत. सणसवाडी (ता.शिरूर) येथील महाराष्ट्र राज्य श्रमिक महासंघाच्या जनसंपर्क कार्यालयात पञकार बांधवांचा दिवाळी सणा निमित्ताने स्नेह मिलन कार्यक्रम बहुजन समाज पार्टीच्या वतीने आयोजित करण्यात आला होता.या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाराष्ट्र राज्य श्रमिक महासंघाचे संस्थापक अध्यक्ष सणसवाडी गावचे विद्यमान उपसरपंच राजु (आण्णा) दरेकर हे होते.तसेच प्रमुख पाहुणे म्हणुन बहुजन समाज पार्टीचे युवा नेते एडवोकेट विशाल सोनवणे,सामाजिक कार्यकर्ते बाळासाहेब सैद,जेष्ठ पञकार राजाराम गायकवाड आदि उपस्थित होते.त्यांनी सर्व बहुजन समाज बांधवांना व पञकार बांधवांचे कौतुक करून दिवाळीच्या मनपुर्वक शुभेच्छा दिल्या.यावेळी जेष्ठ पञकार राजाराम गायकवाड,पञकार प्रविणकुमार जगताप सर,पञकार व सर्पमिञ शेरखान शेख,पञकार गजानन गव्हाणे,पञकार नुरमोहम्मद मुल्ला सर,पञकार रिजवान बागवान,पञकार कवि लेखक आकाश भोरडे,पञकार रविंद्र पवार,पञकार सोमनाथ (बंटी) नवले,पञकार गोविंद मोरे,पञकार तात्याराम मोरे आदि मोठ्या संख्येंने उपस्थित होते.बहुजन समाज पार्टीचे सोमनाथ कुदळे,बाळासाहेब आवारे,रमाकांत खंडे,जयंत पोटे,प्रविण कांबळे,एडवोकेट किरण सोनवणे,रविंद्र कांबळे,अनिल गायकवाड,प्रदिप गायकवाड आदि पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येंने उपस्थित होेते. कार्यक्रमाचे प्रास्ताविक रविंद्र कांबळे यांनी केले असुन आभार पञकार रविंद्र पवार यांनी मानले आहे.