मारोती सुर्यवंशी शहर प्रतिनिधी नरसी
नांदेड लोकसभा निवडणूकीसह संबंध महाराष्ट्र राज्यात होणाऱ्या विधानसभा निवडणुकीत नायगाव विधानसभा मतदारसंघात इच्छुक, स्वयं घोषित भावी आमदारांची स्वप्न रंगवत एकुण 26 जणांनी उमेदवारी अर्ज दाखल केले होते.पण…त्यातील एकुण काल अर्ज माघारी घेण्याच्या अखेरच्या दिवशी शिवराज पाटील होटाळकर, राजेश कुंटूरकर,व गोरठेकर बंधू या दिग्गजांसह सोळा 16 उमेदवारांनी आपले उमेदवारी अर्ज मागे घेण्यात आले. आता फक्त दहाच उमेदवार रिंगणात आहेत, असे असले तरी या “”दस का दम” मधून “तिरंगी” लढत होण्याची शक्यता आहे कारण या तीन उमेदवारांना जोरदार लढा देण्यासाठी लागणारी ताकद ईतर उमेदवारांत सध्या तरी दिसत नाही. केवळ आपल्या अथक परिश्रमावर व मतदार राजाच्या निर्णयांवर सर्वांना अवलंबून राहावे लागणार आहे.याचबरोबर प्रत्येक उमेदवाराने त्याच्या त्यांच्या परीने एक मेकां विरोधात तगडे आव्हान उभे केले आहे. एकीकडे भा.ज.पा.कडून तरुण उत्साही विकासाची कामे करु पहाणारे राजेश पवार तर दुसऱ्या बाजूला काँग्रेसचे नेते मुरब्बी, मुत्सद्दी, अनुभवी असणारे सर्वपरिचित माजी राज्यमंत्री भास्करराव पाटील खतगावकर यांच्या स्नुषा डॉ.मिनलताई खतगावकर काँग्रेस तर वंचित बहूजन आघाडीचे डॉ . माधव विभुते यात कोण बाजी मारणार हे पहाणे रंजक ठरेल.यात माघार घेणारी मंडळी व मतदार कुणा कुणाला मदत करतील यांवरही बरेच काही अवलंबून आहे अशी मतदारसंघात चर्चा चालु आहे .