कैलास खोट्टे जिल्हा प्रतिनिधी बुलढाणा
संग्रामपूर तालुक्यातील सोनाळा येथे दिनांक 4 नोव्हेंबर रोजी संध्याकाळी पाच वाजता माननीय आमदार डॉक्टर संजय जी कुटे यांनी श्री संत सोनाजी महाराज मंदिर मध्ये सोनाळा जिल्हा परिषद सर्कल मध्ये 31 गाव असून याच उद्देशाने 31 नारळ फोडून आपल्या प्रचाराची सुरुवात केली आहे सर्वप्रथम श्री संत सोनाजी महाराज यांचे पूजन करून हार अर्पण केले. त्यानंतर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला हार अर्पण करून नंतर महात्मा फुले चौक मध्ये महात्मा फुले यांचे पूजन करण्यात आले. आज पर्यंत जेवढे काही विकास कामे झाले असतील ते फक्त आणि फक्त जनतेच्या आशीर्वादानेच झाले. मी सदैव जनतेचाच आहे आणि त्यांच्यासाठी सदैव अविरतपणे कामे करत राहील असे आमदार डॉक्टर संजय कुटे यांनी बोलताना सांगितले.लाडकी बहिण योजना ही माझ्या प्रत्येक बहिणी साठी आहे.आणि ती भविष्यात सुध्धा चालूच राहणार आहे.मी माझ्या बहिणी साठी सदैव पाठीशी राहील अशी ग्वाही मा.आमदार संजय कुटे यांनी दिली.स्थानिक लोकांशी चर्चा केली असता.त्यांनी सुध्धा mcn न्यूज रिपोर्टर शी बोलताना त्यांच्या विकास कामाबद्दल सांगितले.यामध्ये सोनाला जि. प.सर्कल मधील सर्व भारतीय जनता महायुती चे सर्व कार्यकर्ते हजर होते.









