मुकेश बागडे तालुका प्रतिनिधी सावनेर
काटोल -विधानसभा निवडणुकीच्या प्रचारासाठी शरदचंद्र पवार साहेब हे दोन दिवसाच्या विदर्भ दौऱ्यांवर येत असून ते महाविकास आघाडीच्या उमेदवारांसाठी सभा घेणार असल्याची माहिती माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांनी दिली. ७ नोव्हेंबरला सकाळी शरद पवार साहेब हे नागपूर येथे येतील यानंतर सकाळी ११ वाजता पुर्व नागपूर येथे प्रचार सभा घेतील. नंतर हेलीकॉप्टरने तिरोडा येथे जावून दुपारी २:३० वाजता तेथे सभा घेणार. तेथुन ते हेलीकॉप्टरनेच काटोल येथे जावून सायं. ५ वाजता सभा घेतील. परत नागपूर येथे येवून मुक्काम करतील. ८ नोव्हेंबर सकाळी ११ ला हिंगणघाट व दुपारी ३ वाजता जिंतुर तसेच सायं. ७ वाजता वसमत येथे सभा घेणार असल्याची माहिती अनिल देशमुख यांनी दिली.