संतोष भरणे ग्रामीण प्रतिनीधी इंदापूर
इंदापूर -माजी मंत्री हर्षवर्धन पाटील यांनी रुई येथे यात्रेच्या निमित्ताने प्रसिद्ध श्री बाबीर देवाचे सोमवारी (दि.4) दर्शन घेतले. याप्रसंगी हर्षवर्धन पाटील यांनी बाबीर देवाची पूजा केली व आशिर्वाद घेतले. दरम्यान, बाबीर देवाच्या यात्रेला राज्यभरातून लाखो भाविकांनी गर्दी केली होती.राज्यात बाबीर देवाचे मंदिर व यात्रा प्रसिद्ध आहे. बाबीर बुवा हे आपले सर्वांचे श्रद्धास्थान आहे. बाबीर देवाच्या आशीर्वाद कायमच आपल्या पाठीशी आहेत. मी लहानपणापासून प्रत्येक वर्षी यात्रेला येऊन बाबीर देवाचे आशीर्वाद घेत आहे. बाबीर बुवाचे दर्शन घेतल्यावर प्रेरणादायी ऊर्जा प्राप्त होते, असे गौरवोद्गार हर्षवर्धन पाटील यांनी काढले.यावेळी हर्षवर्धन पाटील यांनी यात्रेसाठी राज्यभरातून आलेल्या भाविकांशी संवाद साधला. आपले सर्वांचे श्रद्धास्थान असलेल्या बाबीर देवाची यात्रा दिवसेंदिवस वाढत चालली आहे, त्यामुळे भाविकांची गैरसोय होऊ नये म्हणून प्रशासनाने दक्ष रहावे, अशी सूचनाही हर्षवर्धन पाटील यांनी केली. यावेळी बाबीर देवस्थान ट्रस्टच्या वतीने हर्षवर्धन पाटील यांचा सत्कार करण्यात आला. तसेच अमोलजी भिसे यांचे वतीने प्रति वर्षी प्रमाणे आयोजीत बाबीर यात्रा महोत्सवातील गजी ढोल नृत्य स्पर्धेदरम्यान हर्षवर्धन पाटील यांनी गज ढोल वाजवण्याचा आनंद घेतला. याप्रसंगी बाबीर देवाचं चांगभलं…च्या घोषणांनी परिसर मिळून गेला होता. यावेळी पदाधिकारी, कार्यकर्ते, ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.