संजय डोंगरे ग्रामीण प्रतिनिधी माना
महाविकास आघाडीत सामील असलेल्या राष्ट्रवादी शरद पवार गटाच्या वाट्याला मुर्तीजापुर मतदार संघ गेला असून माननीय. सम्राट भाऊ डोंगरदिवे यांना उमेदवारी जाहीर झालेली आहे गुरुवारी राष्ट्रवादी शरद पवार गट यांनी राज्यातील ४५ उमेदवाराच्या नावाची यादी प्रसिद्ध केली. त्यामध्ये मुर्तीजापुर विधानसभा मतदार संघातून सम्राट डोंगरदिवे यांना निवडणुकीच्या रिंगणात उतरविण्यात आले आहे. हा मतदारसंघ एससी साठी राखीव आहे. सम्राट भाऊंनी या कार्यक्षेत्रात अनेक सामाजिक व सांस्कृतिक व प्रबोधनात्मक कार्यक्रम घेतले आहे. भाऊंची ख्याती दूरपर्यंत पोहोचलेली आहे. सम्राट भाऊंचा स्वभाव अत्यंत मनमिळाउ, साधा आहे. गोरगरीब व गरजू लोकांना त्यांनी सढळ हाताने मदत केली आहे. नेहमी संकटाच्या वेळी धावून येणारे असे आमचे सम्राट भाऊ आहेत त्यांचे काम वाखाण्याजोगे आहे. त्यांच्याबद्दल कितीही बोलले तरी कमीच आहे असे त्यांचे व्यक्तिमत्व आहे. त्यांच्या याच कार्याची दखल घेऊन राष्ट्रवादी शरद पवार गटाने त्यांना उमेदवारी जाहीर केलेली आहे. महाविकास आघाडीचे युवा व तडफदार असे आमचे सम्राट भाऊ डोंगरदिवे यांना मनःपूर्वक शुभेच्छा. त्यांच्या उमेदवारीमुळे महाविकास आघाडीच्या कार्यकर्त्यांमध्ये एकच उत्साह व जल्लोष करण्यात आला. सम्राट भाऊंना यावर्षी निवडून आणू असा निश्चय त्यांनी या वेळेस बोलून दाखविला.