मधुकर बर्फे तालुका प्रतिनिधी पैठण
पैठण : पैठण तालुक्यातील चितेगाव येथे व चितेगाव परिसरात गेल्या अनेक दिवसांपासून प्रतिबंधित अवैध गुटखा विक्री व्यावसाय मोठ्या जोमात चालु असल्याने बिडकीन पोलिस ठाण्यात नव्याने रूजू झालेले सहाय्यक पोलीस निरीक्षक निलेश शेळके यांना खबऱ्याकडून माहिती मिळताच त्यांनी बिडकीन पोलिस टीमच्या साह्याने छापा टाकून ५७ हजार रुपयांचा गुटखा जप्त केला आहे. सहाय्यक पोलीस निरीक्षक निलेश शेळके काही दिवसांपूर्वी नव्याने रुजू झाले असून त्यांनी पदभार स्वीकारल्यापासून धडाकेबाज कारवाया होत असुन.त्यामुळे अवैध धंदे करणाऱ्याचे धाबे दणाणले आहे.बिडकीन येथील नामांकित गुटकाकिंग समीर सलाउद्दीन शेख वय ३४ रा. बिडकीन ता. पैठण समीर इंटरप्राईजेस च्या नावाखाली खुलेआम गुटखा विक्री करत असल्याची माहीती बिडकीन पोलिसांना मिळाली. यावरून बुधवार २३ ऑक्टोबर च्या रात्री ९ वाजेच्या सुमारास चितेगाव विरा इंटरप्रायजेस कंपनीच्या वसाहती जवळ असलेल्या भागाजीनगर येथील घरामध्ये पोलीस पथकाने छापा मारून विविध कंपन्यांच्या गुटखा आरोपीच्या ताब्यातून एकूण ५७ हजार ६५८ रु. मुद्देमाल जप्त केला असुन बिडकीन पोलिस ठाण्यात आरोपीवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.सदर कारवाई सहाय्यक पोलीस निरीक्षक निलेश शेळके यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक महेश घुगे, संदीप धनेधर, योगेश नाडे, ताराचंद गव्हाणे, साहेबराव राठोड यांनी केली.


