नागपुर जिल्ह्यातील संपूर्ण आंबेडकरी समुदाय करीत आहेत निषेध .
मुकेश बागडे तालुका प्रतिनिधी सावनेर
सावनेर – महाराष्ट्राचे उपमुख्यंत्री मा. देवेंद्र फडणवीस यांनी शुक्रवारी आपले नामांकन फॉर्म भरले . नामांकन अर्ज सादर करताना नागपूर च्या मुख्य मार्गावरून हजारोच्या संख्येने कार्यकर्त्यांना सोबत घेवून शक्तिप्रदर्शन करण्यात आले . त्यावेळी त्यांच्या सोबत केंद्रीय मंत्री नितीन गडकरी , बहुजन रिपब्लिकन एकता मंचचे अध्यक्षा सुलेखा कुंभारे , पीपल्स रिपब्लिकन पार्टी चे जोगेंद्र कवाडे , जगदिप कवाडे , माजी आमदार मिलिंद माने इत्यादी नेते उपस्थित होते . शक्तिप्रदर्शन रैली बाबासाहेबांच्या पुतळ्याला माल्यार्पण करण्याकरिता संविधान चौक विधानसभा येथे पोहचली , परंतु फडवणीस आणि गणमान्य वेक्ति तर्फे माल्यार्पण करीत असतां उपस्थित समुहाकडून बाबासाहेबांचा जयघोष न करता श्रीराम च्या घोषणा झाल्याने आंबेडकरी समूह नाराज झाल्याची सर्वत्र चर्चा आहे . त्याच बरोबर संविधान चौकात बाबासाहेबांच्या पुतळ्याला सुरक्षा व सुशोभित करणारी रेलिंग सुद्धा त्या रेलितील समूहाकडून तोडून नुकसान झाल्याने , आणि पुतळ्या जवळील पंचशील व निळे झंडे वाकवून फोटो काढल्याने आंबेडकरी जनतेने भावना दुखल्याचे बोलले जात असून सर्वत्र निषेध व्यक्त केला जात आहे . त्यामुळे नागपूर जिल्ह्यात उपमुख्यमंत्री फडवणीस आणि त्यांच्या पक्षाला आंबेडकरी जनता काय प्रतिसाद देतील हे येणारी निवडणूक ठरवेल अश्या चर्चेला परिसरात वेग येत आहे .