अरविंद बेंडगा तालुका प्रतिनिधी, डहाणू
डहाणू :- आज झाई चेक पोस्टवर ड्युटी दरम्यान भरत सुरती (रा. देहरी) नावाच्या इसमाला रस्त्यावर एक लहान मुलगा फिरताना दिसला. त्याने मुलाची विचारपूस केली असता, मुलाने आपले नाव आदित्य असल्याचे सांगितले, पण पूर्ण नाव माहित नसल्याचे सांगितले. त्याचप्रमाणे, तो हरवल्याचे सांगून रस्ता माहित नसल्याचे कळवले.भरत सुरती यांनी मुलाला झाई चेक पोस्टवर आणले व आमच्या ताब्यात दिले. अधिक चौकशीनंतर, मुलाचे आजोबा दिलीप चंदू सापटे व आजी गुलाब चंदू सापटे (रा. भिनारी, ता. डहाणू) यांच्याकडे मुलाला सुपूर्द करण्यात आले व तो घरी पाठवण्यात आला.


