अर्पण तारा पाटील जिल्हा प्रतिनिधी पालघर
पालघर : पालघर जिल्हाधिकारी कार्यालयात पोलीस स्मृतिदिन २१ ऑक्टोबर साजरा करून श्रध्दांजली दर वर्षी प्रमाणे वाहिली जाते. आपले कर्तव्य पार पाडत असताना देशासाठी आपले प्राण पणाला लावून शक्तीने लढून प्राण गमवावे लागले. प्राण गमावलेल्या हुतात्म्यांना पोलीस स्मृतिदिनानिमित्त पोलीस अधीक्षक कार्यालय पालघर येथे जिल्हाधिकारी मा. श्री. गोविंद बोडके, पालघर पोलीस अधीक्षक मा. श्री. बाळासाहेब पाटील,पालघर पोलीस अप्पर अधिक्षक मा. श्री. विनायक नरळे, पालघर चे उपस्थित पोलीस ठाण्याचे हद्दीतील पोलीस अधिकारी, अंमलदार यांच्या वतीने श्रध्दांजली वाहण्यात आली. ज्यांना आपले प्राण गमवावे लागले आहेत. त्यांना हे राष्ट्र त्यांचे बलिदान कधीच विसरणार नाही.








