महागांव शहरातील कार्यकर्त्यांमध्ये रंगली चर्चा
अनिस सुरैय्या तालुका प्रतिनिधि महागांव
महागांव: सध्या महाराष्ट्रातील विधानसभा निवडणुकीची आचार संहिता लागू झाली असुन सदर निवडणुक मध्ये उमरखेड-महागांव विधानसभा क्षेत्रातील अनेक उत्सुक असलेल्या उमेदवारांनी पक्षाकडुण उमेदवारी मिळविण्याकरीता एकमेकां विरूद्ध रस्सीखेच चालु झाली आहे.तसेच या विधानसभा क्षेत्रातील अनेक कार्यकर्ता हे भाविक भगत यांच्यावर नाराज असल्याची चर्चा सध्या उमरखेड महागांव विधानसभा क्षेत्रातील कार्यकर्त्यांमध्ये रंगली आहे.तसेच भाविक भगत यांना भाजपा पक्षा कडुण उमेदवारी मिळाल्यास भाजपा चे असंख्य कार्यकर्ता काॅंग्रेस पार्टीला आपला जाहिर पाठींबा देणार अशी चर्चा सध्या महागांव शहरात रंगली आहे.त्यामुळे भाविक भगत यांना भाजपा पक्षा कडुण उमेदवारी मिळाल्यास आपली एक सीट गमावण्याची वेळ भारतीय जनता पार्टी वर येवु शकते.त्यामुळे भाविक भगत यांना भाजपा पक्षा कडुण उमेदवारी नाकारण्यात यावी अशी चर्चा सध्या महागांव शहरात रंगली आहे.तसेच भाविक भगत यांना भाजपा पक्षा कडुण उमेदवारी मिळाल्यास भाजपा पक्षातिल असंख्य कार्यकर्ता काॅंग्रेस मध्ये पक्ष प्रवेश करणार असल्याची माहिती भारतीय जनता पार्टीच्या एका कार्यकर्ता ने नांव न सांगण्याच्या अटीवर दीली आहे.