मनोज गवई जिल्हा प्रतिनिधी अमरावती
चांदूर रेल्वे :- शहरातिल् नावाजलेल्या सहकार क्षेत्रातील अनेक बँकापैकी बुलढाणा अर्बन क्रेडिट को ऑपरेटिव्ह सोसायटी ,बुलढाणा च्या शाखा चांदुर रेल्वे बँक चौदा वर्षानंतर आपल्या कुऱ्हा रोड येथील आपल्या नवीन जागेत स्थानंतरीत होत आहे त्याचा स्थानंतरण सोहळा मोठ्या उत्साहाने आज संपन्न झाला. अल्पावधीतच शहरातील तसेच तालुक्यातील अनेक लोकांचा विश्वास प्राप्त करणारी बँक असा लौकिक प्राप्त करणारी ही बँक ठरली. जमा खाते ,चालू खाते , नेफ्ट ,आर. टी जी. एस. ,ह्या सुविधेसह अल्प दरात सर्व सामान्य जनतेला सोने तारण कर्ज तसेच विविध कर्ज सुद्धा बँक देते आहे. बँकेच्या ह्या नवीन जागेत नव्याने लॉकर सुविधा ग्राहकांना देण्यात येणार आहे. यासोबतच संस्थेद्वारे अनेक समजभिमुख उपक्रम सुद्धा राबविले जाते त्याचाच एक भाग म्हणून ग्राहकांना तसेच सामान्य जनतेला शिर्डी ,माहूर तसेच तिरुपती बालाजी येथे सुद्धा अत्यल्प दारात सर्व सोयी सुविधासह भक्तनिवास सुद्धा संस्थेने उपलब्ध करून दिले असल्याचे शाखा व्यवस्थापक प्रशांत देशमुख यांनी प्रतिक्रिया देताना आपले मत व्यक्त केले आहे. स्थानातरणं सोहळ्याच्या ह्या कार्यक्रमाला विभागीय व्यवस्थापक नितीन काळे ,शाखा व्यवस्थापक प्रशांत देशपांडे , रुपाली देशमुख,अनिकेत अंबाडकर ,धनंजय शिमरे,प्रदीप भोयर ,सोमनाथ काटकर, दीपक वानखडे तसेच अनेक ग्राहक व प्रतिष्ठीत निमंत्रिक नागरिक उपस्थित होते.