संतोष भरणे ग्रामीण प्रतिनिधी इंदापूर
कळस-क्रीडा व युवक सेवा संचालनायल महाराष्ट्र राज्य पुणे आयोजित जिल्हा क्रीडा संकुल परभणी येथे संपन्न झालेल्या राज्यस्तरीय कुस्ती स्पर्धेमध्ये 14 वर्ष वय ३३ किलो वजनगटातील मुलींच्या कुस्ती स्पर्धेमध्ये पुणे जिल्हा शिक्षण मंडळाच्या श्री हरणेश्वर विद्यालय कळस विद्यालयाची इ.६ वी वर्गात शिक्षण घेत असलेली विद्यार्थिनी श्रावणी नवनाथ चौगुले हीने राज्यात व्दितीय क्रंमाक मिळवून रौप्य पदाची मानकरी ठरली आहे.कुस्ती प्रशिक्षक वस्ताद प्रताप खोमणे ,वस्ताद हनुमंत पवार क्रीडा शिक्षक . श्री सौदागर सर श्री गणेश वायाळ सर यांनी तिला मार्गदर्शन व सहकार्य केले .विद्यालयाच्या मुख्याध्यापिका श्रीमती भोसले एम.डी.पर्यवेक्षिका श्रीम.सोनवणे मॅडम शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी सर्व आजी-माजी विद्यार्थी व समस्त ग्रामस्थ कळस यांनी सर्वांचे अभिनंदन केले.