राष्ट्रवादीचे भूमिकेने महायुतीला फटका बसण्याची शक्यता
राष्ट्रवादीच्या वरिष्ठांनी नाराज कार्यकर्त्यांची मनधरणी करणार का?
निसार शेख शहर प्रतिनिधी मुरूम
विधानसभा निवडणुकीच्या अनुषंगाने उमरगा येथे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची प्रमुख पदाधिकाऱ्यांची राष्ट्रवादीचे प्रदेश उपाध्यक्ष सुरेश बिराजदार यांच्या प्रमुख उपस्थित बैठक सोमवारी दिनांक २१ रोजी संपन्न झाली या बैठकीत राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी लोकसभा पाठोपाठ विधान परिषदे निवडीमध्येमध्ये राष्ट्रवादीचे प्रदेश उपाध्यक्ष सुरेश बिराजदार यांना डावलण्यात आल्याने राष्ट्रवादी काँग्रेसच्या श्रेष्ठीवर नाराजगी व्यक्त करत विधानसभा निवडणुकीत आक्रमक भूमिका घेण्याच्या भावना व्यक्त केल्या दरम्यान सध्यास्थितीत कार्यकर्त्यांनी तटस्थ राहण्याचा निर्णय घेऊन पक्षाचा कार्यकर्ता मेळावा घेऊन पुढील भूमिका जाहीर करणार असल्याचे उमरगा लोहारा तालुक्याचे अध्यक्षांनी पत्रकार परिषद घेऊन जाहीर केले राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेश उपाध्यक्ष सुरेश बिराजदार यांना पक्षाने लोकसभेच्या निवडणुकीत उमेदवारी देण्याचे जाहीर करून निवडणूक प्रचारात उतरविले होते ऐनवेळी सुरेश बिराजदार यांना डावलून आयात उमेदवाराला उमेदवारी दिल्याने राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या कार्यकर्त्यांसह सुरेश दाजी समर्थकांमध्ये नाराजीचे सूर उमटले होते अनेक पदाधिकाऱ्यांनी त्यांच्या पदाचे राजीनामे दिले होते राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष तथा उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांनी पदाधिकारींची समजूत काढून जाहीर रित्या सुरेश बिराजदार यांना आगामी काळात विधिमंडळात घेणार असल्याचे आश्वासन दिले होते. विधान परिषदेवर दोन वेळा वेगवेगळ्या सदस्यांना उमेदवारी देऊन आमदार केले परंतु सुरेश बिराजदार यांना दिलेला शब्द पाळला नाही. तसेच विद्यमान आमदार ज्ञानराज चौगुले यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष माययुतीचा घटक असताना देखील सापत्नपणाची वागणूक दिली आहे त्यामुळे उमरगा तालुकाध्यक्ष बाबा जाफरी व लोहारा तालुकाध्यक्ष सुनील साळुंखे यांच्यासह राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या प्रमुख पदाधिकाऱ्यांनी पत्रकार परिषद घेऊन उघड नाराजी व्यक्त केली. येणाऱ्या काळात राष्ट्रवादी काँग्रेस तटस्थ भूमिका घेतली असल्याचे सांगण्यात आले. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने घेतलेल्या भूमिकेबाबत विद्यमान आमदार ज्ञानराज चौगुले राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला आपल्याकडे वळवण्यात यशस्वी होतील का हे येणाऱ्या काळात आपल्याला पाहायला मिळेल.








