सुरतान पावरा तालुका प्रतिनिधी अक्राणी
एकीकडे मतदानाच्या टक्केवारीत वाढ व्हावी म्हणून प्रशासन मार्फत जनजागृती अभियानादवारे विविध उपक्रम राबविले जात आहेत. तर दुसरीकडे अक्कलकुवा,अक्राणी तालुक्यातील विविध गावागावातून रोजगारानिमित्त गुजरात राज्यात दरवर्षी शेकडो मंजूर स्थालातरित होत आहेत. परिणामी मतदारांची टक्केवारी घट होण्याची निर्माण झाली आहे. दरवर्षी दिवाळी दरम्यान अक्कलकुवा अक्राणी तालुक्यातील विशेषत: मोठ्या प्रमाणावर ऊसतोडीसाठी गुजरात राज्यात मंजूराचे स्थालातर होते.स्थानिक पातळीवर रोजगाराचा अभाव किंवा स्थानिक पातळीवर मिळणाऱ्या मंजूरीपेक्षा अधिक प्रमाणात मिळणार मंजूरांचा स्थालांतराचे रोखण्यासाठी शासन अपयशी ठरले आहे.एवढे मात्र निश्चित! यावेळी होऊ घातलेल्या निवडणूका या नेमक्या मंजूराच्या स्थालातरीत कालावधीत असल्याने त्यांच्या परिणाम साहजिकच मतदानाच्या टक्केवारीवर होऊ शकतो कारण दरवर्षी शेकडो मंजूर अक्कलकुवा अक्राणी मतदारसंघातून स्थालांतरीत होत आहेत. ऊस तोडीसाठी सातपुड्याच्या दऱ्याखोऱ्यातून मंजूर नेले जातात गावागावांत मुकादम नेमला जाऊन मुकादम साधारण २० ते २५ मंजूरांची एक टोळी बनवतो या टोळीला पावसाळ्याच्या दिवसात मंजूर नसताना एडव्हान्स रुपाने पैसे दिले जातात मजूरांना ही अडचणीच्या वेळी पैशाची मदत घेतल्याने तेही मुकादामशी बांधली असतात एकप्रकारे मुकादम व मजूरांमध्ये विश्र्वासाच्या जोरावर करारस झालेला असत दसरा दिवाळी ते होळी अक्षय तृतीय दरम्यान ऊस तोडीचा हंगामात सालू असतं हंगामा संपल्यानंतर मंजूर आपल्या गावाकडे परतताना मध्यंतरच्या कालावधीत त्यांनी कमावलेल्या मजूरीतून एडव्हाचाची रक्कम वसूल केली जाते. मंजूराचे मोठ्या प्रमाणावर स्थालातर निश्चित उमेदवारांना अडचणीत टाकणारे आहे. कोणाला किती बसू शकतो, हे सांगणे आज तरी कठीण असले तरी अवध्या काही मतांनी आपण पराजित होऊ नये यासाठी ऐन मतदानाच्या दिवशी मतदानासाठी स्थालातरी मतदारांना आणण्याचा फंडा देखील वापर होऊ शकतो.