तुकाराम पांचाळ ग्रामीण प्रतिनिधी धर्माबाद
धर्माबाद : दि. धर्माबाद व परिसरातील सर्व धर्मप्रेमी व्यक्तींच्या सहकार्याने व उपस्थितीत साजरा होणारा श्री विठ्ठलेश्वर मंदिर धर्माबाद येथील सुप्रसिद्ध काकडा आरती सोहळा दि:17.10.2024( गुरुवार) पासून सुरुवात झाली. पहिल्या दिवसाची काकडा आरती प्रसाद सेवा यजमान श्री व्यंकटेश नारायण गादेवार यांचे पासून सुर्वात करण्यात आली पूर्वी अनेक वर्षांपासून सातत्याने चालत असलेला हा उत्सव अगदी श्रद्धेने भाव पूर्वकसर्व भाविक भक्त एक महिना नित्यनेमाने काकडा आरतीस मंदिरात उपस्थित राहून भगवंताचा आशीर्वाद प्राप्त करत असतात.दरवर्षी प्रमाणे या वर्षीही मोठ्या उत्साहात कार्तीक स्नान च्या पार्श्वभूमीवर कोजागिरी पौर्णिमेपासून श्री विठ्ठलेश्वर मंदीरात मोठ्या उत्साहात काकडा आरतीस प्रारंभ करण्यात आला आहे.प्रारंभी श्री विठ्ठल रखुमाई च्या मुर्तीची विधीवध पुजा,सजावट मुख्य अर्चक अरुण गुरू ऐनवाले यांनी केली.तद्नंतर भजनी मंडळी यांनी मोठ्या उत्साहात नित्य नेमाचे भजन,अभंग टाळ मृदंगाच्या घोषात काकडा आरती चे अभंग गित गायन करत आसतात.सर्व भाविक भक्तांच्या उपस्थितीत विठ्ठल रखुमाई ची काकडा आरती केली जाते.काकडा आरतीचे अभंग भजन सकाळी 6 ते 7.10 या वेळेत तर काकडा आरती 7.15 ला संपन्न होत असते पहिल्या दिवसापासून मोठ्या प्रमाणात भाविक उपस्थित राहून काकडा आरतीचा सर्व भावीक भक्त आनंद घेत असतात जय जय राम कृष्ण हरी माऊली