गजानन वानोळे ग्रामीण प्रतिनिधी किनवट
83 किनवट माहूर विधानसभा क्षेत्रात वंचित बहुजन आघाडीचे उमेदवारी जाहिर झाल्यापासून वाडी तांडयात गावपातळीवर ग्रामीण भागात सर्वत्र वंचित बहुजन आघाडीचे प्रा. विजय खुपसे यांची चर्चा सध्यातरी जोरदार रंगत असल्याचे पानटपरी हॉटेल जागोजागी होताना दिसत आहे. मागील काही वर्षाचा कार्यकाळ पाहिला तर, माजी प्रदिप नाईक यांनी 15 वर्ष आमदार म्हणून कार्य केले व व विद्यमान आमदार भिमराव केराम यांनी मागील अंदाजित अठरा महिने व चालू पाच वर्षाचा कार्यकाळ पाहिला यामध्ये सामान्य जनता व कार्यकर्ते यांची दुराविक निर्माण झाल्याचे किनवट माहूर मतदार संघात पाहायला मिळत आहे अशा प्रकारच्या चर्चा सध्या तरी जागोजागी होताना दिसत आहेत. किनवट माहूर विधानसभा क्षेत्रात हम दो शेर असे वातावरण निर्माण झाले होते परंतु यावेळेस वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार प्रा. विजय खुपसे यांचा बोलबाला होताना सध्यातरी दिसून येत आहे. यावेळेस एखादा नवखा उमेदवार निवडून द्यावा अशी मतदाराची प्रत्येक ठिकाणी चाय पे चर्चा होताना दिसून येत आहे . प्रा. विजय खुपसे यांना वंचित बहुजन आघाडीची उमेदवारी जाहिर झाल्यापासून अठरापगड जाती जमातीचे लोक किनवट माहूर विधासभा क्षेत्रात दोघात तिसरा आता सगळ विसरा अशा चर्चा रंगताना मतदाराकडून ऐकावयास मिळत आहेत. किनवट माहूर विधानसभा मतदारसंघात परिवर्तन बद्दल घडवून आणण्याच्या प्रयत्नात सध्यातरी आणतील असे संकेत प्रत्येक ठिकाणी दिसून येत आहेत