सुमेध दामधर ग्रामीण प्रतिनिधी संग्रामपूर
सोनाळा :- दिनांक 20 सप्टेंबर 2024 रोजी आंबेडकरी व्हाईस मीडिया फोरम संघटनेची बैठक अकोला येथे अशोक वाटिका हॉलमध्ये संपन्न झाली. सदर बैठकीचे अध्यक्ष संघटनेचे संस्थापक केंद्रीय अध्यक्ष उत्तमजी वानखडे हे होते. या बैठकीमध्ये महाराष्ट्र राज्यातूनच नवे तर इतर राज्यातूनही आंबेडकरी पत्रकारांनी उपस्थिती लावली. सदर बैठकीमध्ये संघटनेचे ध्येयधोरण उद्दिष्ट सांगण्यात आले तसेच ही संघटना पत्रकारांच्या न्याय हक्कासाठी तसेच समाजातील विविध समस्या शासन दरबारी पोहोचण्यासाठी काम करेल असे यावेळी संस्थापक अध्यक्षांनी सांगितले. समाजातील अनिष्ट चालीरीती अंधश्रद्धा याही गोष्टीकडे संघटना लक्ष देईल तसेच 14 एप्रिल महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची जयंती ही डीजे मुक्त करून त्याच पैशातून धीरे धीरे का होईना बुद्धिस्ट शैक्षणिक संस्था उभारण्यात याव्या असे प्रतिपादन यावेळी अध्यक्षीय भाषणात सांगण्यात आले. तसेच संघटनेतील सर्व सभासदांना आपल्या आपल्या परिसरात या कार्याची अंमलबजावणी करावी असे आदेश देण्यात आले. या कार्यक्रमाला बरेचशा पत्रकारांनी आपले मनोगत व्यक्त केले तसेच संघटनेमध्ये तन-धन धनाने काम करू असे सांगितले. या बैठकीमध्ये नवनियुक्त पदाधिकाऱ्यांना नियुक्तीपत्र व आयडी कार्ड देण्यात आले सदर कार्यक्रमाची सुरुवात ही त्रिशरण पंचशील घेऊन सांगता सरनेते गाथेने करण्यात आली व नंतर भोजनदान देण्यात आले. सदर बैठकीला संस्थापक अध्यक्ष उत्तम जी वानखडे केंद्रीय महासचिव प्रकाश सरदार महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष महेंद्र सावंग महाराष्ट्र प्रदेश सचिव देवचंद्र समदूर तसेच बुलढाणा जिल्हाध्यक्ष उल्हास शेगोकार. केंद्रिय संघटक विजय खरात , यांनी सुद्धा आपले विचार मांडले .कार्यक्रमाला किरण मोरे कार्याध्यक्ष, राज्य सहसचिव सन्घरत्न सपकाळे , राज्य संघटक पद्माताई मोहोड,विदर्भ अध्यक्ष किरण उपाध्ये, उपाध्यक्ष महादेव धवसे, राज्य कोषाध्यक्ष दिगंबर कंकाळ, सह प्रकाश तायडे, वाशिम जिल्हा अध्यक्ष भाग्यश्री गणवीर, सागर पनाड, प्रतापराव मोरे, सुनिल अंभोरे ,राजेंद्र डोंगरे ,मारोती ओंकार, रविंद्र शेगोकर ,संदीप वानखडे, गुलाबराव अंभोरे, मुकेश हेलोडे, दिनेश इखारे, रमेश खंडारे, निलेश लहासे, रितेश दारोकार, सुमेध दामधर, विजय टेंभुर्ने, जयवंत बहादुरे ,दीपक हिवाळे , सुधाकर चंदनशिवे, आशिष पैठने, दीपक चौतमल, रविंद्र चौतमल, चन्द्रपाल जाधव, भास्कर इंगळे, संदीप शिंदे, सिद्धार्थ तायडे, साहेबराव वानखडे, दिलीप वानखडे, प्रतिक वानखडे, प्रज्ञानानंद थोरात ,आनंद जवन्जाळ, उमेश शिरसाट, भिमकिरन दामोधर, संतोष मोरे ,मनोज बागडे ,कैलास खराटे ,अनिल खराटे, विकास वाघोदे, प्रल्हाद खोडके, रामेश्वर खरात, राजेश पी तायडे, रतन डोंगरदिवे, संजय गवई ,रामदास दाभाडे ,विनोद सुरवाडे, सुनिल आराक, प्रकाश तायडे ,अमोल मोरे, आनंद तायडे, शरद शेगोकार, मोहन वाकोडे (महू)मध्य प्रदेश, कैलास मोरे ,अमित वाघमारे,आधी पत्रकार मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन देवचंद्र समदूर तर आभार पंडित परघरमोर यांनी केले. आलेल्या सर्व पत्रकारांचे तसेच आलेल्या पत्रकारांच्या भोजनदानाची व्यवस्था करणारे सुगत वाघमारे तसेच भारतीय बौद्ध महासभा जिल्हा शाखा अकोला यांचे विशेष आभार व्यक्त करण्यात आले.