राजपाल बनसोड तालुका प्रतिनिधी दिग्रस
दिग्रस : तालुक्यातील महागाव येथील एका ७२ वर्षीय शेतकऱ्याचे, सोयाबीनची काढणी करत असताना साप चावल्याची घटना १४ आक्टोंबर रोजी घडली त्यांची १६ ऑक्टोबर रोजी प्राणजित मावळली. दिग्रस तालुक्यातील महागाव येथील शेतकरी मुनीराम नारायण वानखडे (वय वर्षे ७२ )हे आपल्या शेत गट क्रमांक ३०/१ मध्ये असलेल्या सोयाबीन पिकाची काढणी करत असताना त्यांना सापाने चावा घेतला. त्यांच्यावर आर्मी ग्रामीण रुग्णालयात प्रथम उपचारानंतर तात्काळ यवतमाळ येथील शासकीय रुग्णालयात उपचारार्थ दाखल करण्यात आले असता उपचारादरम्यान १६ ऑक्टोंबर रोजी त्यांचे निधन झाले. यवतमाळ येथे शवविच्छेदन केल्यानंतर त्यांचे प्रेत नातेवाईकांच्या स्वाधीन करण्यात आले. महागाव येथे त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात आले. त्यांच्या पश्चात पत्नी,दोन मुले, दोन मुली,नातवंड,असा परिवार आहे. ते सामाजिक कार्यात सदैव अग्रेसर होते. वानखडे यांच्या दुर्दैवी निधनाने गावासह परिसरात हळहळ व्यक्त होत आहे. याप्रसंगी कुटुंबास राहुल ठाकरे यांनी सांत्वन पर भेट दिली. यावेळी अनिल इंगोले, सुभाष गावंडे, मजहर हुसेन, शिवाजी देशमुख,प्रभु जाधव, भगवान मनवर,परमेश्वर गावंडे, गौतम मोहाडे,भीमराव कांबळे, युवराज कांबळे,तेजस गावंडे, रामचंद्र वाघमारे,संतोष चव्हाण, सुभाष वाघमारे सह गावकरी उपस्थित होते.








