संजय डोंगरे ग्रामीण प्रतिनिधी माना
सुजाता महिला संघ व नवयुवक पंचशील मंडळ ( जिनिंग प्लॉट ) माना यांच्या संयुक्त विद्यमाने वर्षावास 2024 निमित्त बुद्ध आणि त्यांचा धम्म वाचन करण्यात आले सदर पाठनाचा समारोपीय कार्यक्रम दी. 20 10 2024 रविवारला संपन्न झाला. कार्यक्रमाची सुरुवात त्रिरत्न पूजा व वंदनेनं करण्यात आली. बाहेरगावच्या महिला संघाचे स्वागत करण्यात आले. ग्रंथवाचक धम्म मित्र सुनील वर्गट सर यांनी संपूर्ण मार्गदर्शन केले. गेल्या तीन महिन्यापासून वर्षावास निमित्त धम्मग्रंथाचे पठण केले. सविस्तर धम्माविषयी माहिती वर्गट सर यांनी महिला संघास दिली. दररोज रात्री नऊ ते दहा या वेळात धम्मग्रंथाचे पठण होत होते. या कार्यक्रम प्रसंगी सामूहिक भोजनदान देण्यात आले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन देवानंद चक्रे व आभार प्रदर्शन सुनील तायडे यांनी केले. सदर कार्यक्रम यशस्वीपणे संपन्न करण्यासाठी सुजाता महिला मंडळ संघाच्या सदस्या महानंदाबाई गवई, सविताबाई कोकणे, ताराबाई वानखडे, कांचन तायडे, विशाखा कोल्हे, ताराबाई खंडारे, सुरेखा सावळे सुरेखा सावळे, दीपमाला तायडे, सुनंदाबाई चक्रे, सुनंदाबाई जवंजाळ, कविताबाई चक्रे,शालिनीबाई वर्गट, रंजनाबाई कोकणे, सविता खंडारे, शशिकलाबाई वाकोडे, पुष्पाताई खंडारे, या महिलांनी विशेष परिश्रम घेतले. तसेच नवयुवक मंडळाच्या तरुण व उत्साही कार्यकर्त्यांनी प्रयत्न करून कार्यक्रम यशस्वीपणे करून दाखविला. शेवटी उपस्थित मान्यवरांचे व संघाचे आभार प्रदर्शन करून कार्यक्रमाची सांगता करण्यात आली.