कैलास श्रावणे तालुका प्रतिनिधी पुसद
ग्रिनपार्क श्रीरामपूर येथील विश्वदिप महाबोधी विहारात वर्षावास समाप्ती कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी धम्मभुषण ॲड.अप्पाराव मैंद , प्रमुख अतिथी म्हणून सोपानराव वैराळे, विश्वदिप महाबोधी विहाराचे अध्यक्ष साहेबराव गुजर, सत्कारमूर्ती सुधाकरराव बन्सोड, तुकाराम चौरे उपस्थित होते.सुरवातीला तथागत भगवान गौतम बुद्ध व डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले.सुजाता महिला मंडळाच्या उपासिकांनी बुद्ध वंदना घेतली.वर्षावासा दरम्यान सतत आषाढ पौर्णिमा पासून अश्विन पौर्णिमेपर्यंत तीन महिने भगवान बुद्ध आणि त्यांचा धम्म या ग्रंथाचे वाचन सुधाकरराव बन्सोड व तुकाराम चौरे यांनी केले त्याबद्दल त्यांचा प्रमुख अतिथींच्या हस्ते शाल व पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला.प्रा.वंदना पुंडकर,व कार्यक्रमाचे अध्यक्ष अप्पाराव मैंद यांनी वर्षावासाचे महत्व आपल्या भाषणातून विषद केले.कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्रा.प्रल्हाद दवने सुत्रसंचलन राजेंद्र इंगोले यांनी तर आभारप्रदर्शन वासुदेव आडोळे यांनी केले.कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी सुजाता महिला मंडळाच्या रत्नमाला शेंडे, जया काळे,रंजना आडोळे,रंजना आळणे, रमाबाई दिघाडे, चन्द्रकला पाईकराव, दिक्षा रणविर, अनिता इंगोले, सविता काजळे, माया पाझारे, सुजाता दवने, शिला गवई,अनिता राजेंद्र इंगोले, सुजाता पाटील, वंदना गुजर, कल्पना पाटील, संजिवनी वैराळे हटकरे गुढे तथा बुद्ध विहार समितीचे प्रकाशराव आळणे, बन्सोड,दशरथ गुढे बोराडे,आदिंची सहकार्य केले.सरनतय गाथेने वभोजनदानाने कार्यक्रमाची सांगता झाली.