शरद भेंडे तालुका प्रतिनिधी अकोट
अकोट : ग्रामीण पत्रकार संघ महा. राज्य,रजी.न.६७६५,अकोट तालुक्याचे वतीने तालुक्यातील दिवंगत पत्रकारांना श्रद्धांजली देण्यात आली.ग्रामीण पत्रकार संघाची आढावा बैठक गरुवार दी.२६-९-२०२४ ला दुपारी १ वा पत्रकार संघाचे कार्यालय नागास्वामी काम्प्लेक्स अकोट येथे संपन्न झाली.या बैठकीत विविध विषयांवर चर्चा करण्यात आली.मागील बैठकीचा आढावा घेण्यात आला.व तालुक्यातील पत्रकार बांधव,स्व चंद्रकांत पालखडे,संजय गवळी,व कमलकीशोर भगत तसेच ग्रामीण पत्रकार संघाचे राज्य उपाध्यक्ष शैलेश अलोने,यांचे अकस्मात निधन झाले. त्यांचे श्रद्धांजली पर कार्यक्रम घेण्यात आला व अध्यक्ष चे परवानगी ने वेळेवर येणरे विषयावर चर्चा करण्यात आली या सभेला राज्य सचीव राजेशजी डांगटे प्रमुख पाहुणे,तर प्रमुख उपस्थितीत विभागीय उपाध्यक्ष अहमदजी शेख व विभागीय समन्वयक कमलेशजी राठी होते.या बैठकीचे अध्यक्ष विठ्ठलराव गुजरकर होते उपस्थित मान्यवरांनी दिवंगत पत्रकारांचे आठवणीला उजाळा देत सामुहीक श्रद्धांजली अर्पण करण्यात आली.या कार्यक्रमाचे सुत्रसंचालन धन्नु बायवार प्रस्तावीक अरुण काकड तर आभार नरेंद्र कोंडे यांनी मानले. यावेळी जेष्ठ पत्रकार गोवर्धनजी चव्हाण, साधुबुवा खोटरे पत्रकार संघाचे अध्यक्ष नरेंद्र कोंडे,सचीव देवानंद आग्रे,कार्याध्यक्ष अरुण काकड उपाध्यक्ष दीपक दाभाडे यांचेसह तुषार अढाऊ,विलास नवले,अश्विन पागृत,दत्तात्रय भगत,कलाम चौधरी,पुर्णा खोडके,धन्नु बायवार,अभिजीत सोळंके फिरोज अहेमद,गणपत केदार,राहुल पाचडे,ई ग्रामीण पत्रकार संघाचे पदाधिकारी उपस्थीत होते.