सुमेध दामधर ग्रामीण प्रतिनिधी संग्रामपूर
सोनाळा :- मागासवर्गीय पत्रकारांच्या न्याय हक्कासाठी खंबीरपणे उभी राहणारी आंबेडकरी व्हॉइस मिडिया पत्रकार संघाची स्थापना दिनांक २४/०९/ २०२४ रोजी शेगाव मधील विश्राम भवन येथील एका आयोजित मीटिंगमध्ये करण्यात आली . सदर पत्रकार संघाचे संस्थापक अध्यक्ष आय बी सेवन न्यूज चैनल चे संपादक उत्तमजी वानखडे हे असून यांच्या अध्यक्षतेखाली सदर बैठक संपन्न झाली यावेळी संस्थापक अध्यक्षांनी संघटनेच्या कामकाजाचा अजेंडा वाचून दाखवला आणि ही संघटना तळागाळातील पत्रकारांच्या न्याय हक्कासाठी तन-मन-धनाने काम करेल अशी ग्वाही दिली. तसेच शासन दरबारी मागासवर्गीय पत्रकारांच्या मागण्या व त्यांच्या न्याय हक्कासाठी संघटना काम करेल. देशाचा चौथा आधारस्तंभ असलेला पत्रकार सक्षम व निर्भीड बनवण्याचा प्रयत्न करू असे यावेळी त्यांनी सांगितले. यावेळी संघटनेच्या केंद्रीय व राज्य कार्यकारणीच्या काही पदाधिकाऱ्यांची नियुक्ती करण्यात आल्या.यामध्ये केंद्रीय अध्यक्ष उत्तमजी वानखडे जळगाव जामोद, केंद्रीय सचिव पदी प्रकाश सरदार भुसावळ (जळगाव खान्देश ), संघटक पदी विजय खरात (मराठवाडा ) केंद्रीय सल्लागार पंडित परघरमोर, तर केंद्रीय कार्याध्यक्ष म्हणून किरण मोरे यांची नियुक्ती करण्यात आली.महाराष्ट्र राज्य कार्यकारिणीत महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष पदी महेंद्र सावंग बुलढाणा, महाराष्ट्र प्रदेश सचिव पदी देवचंद समदूर शेगाव, तर उपाध्यक्षपदी संतोष निर्भवणे (ठाणे ), राज्य संघटक पदी राजवर्धन शेगावकर, राज्य उपाध्यक्षपदी निरंजन भेंडे, सहसचिव पदी संघरत्न सपकाळे भुसावळ(जळगाव खान्देश) तर राज्य कोषाध्यक्षपदी दिगंबर कंकाळ, राज्य संघटक पदी राहुल झोटे व राज्य सल्लागार म्हणून उमेश शिरसाट यांची नियुक्ती करण्यात आली. विदर्भ प्रमुख म्हणून किरण उपाध्ये पुलगाव तर बुलढाणा जिल्हा अध्यक्ष पदी उल्हास शेगोकार यांची नियुक्ती करण्यात आली. यावेळी उपस्थित पत्रकार देवचंद्र हरिश्चंद्र मोरे मलकापूर, प्रशांत हेरोळे (मुक्ताईनगर) सुमेध अरुण दामधर संग्रामपूर , राजेश मनोहर राऊत देवडी , मुकेश जनार्दन हेरोडे खामगाव ,उदयभान नारायण दांडगे संग्रामपूर , सतोष लक्ष्मण धुरंधर खामगाव ,सागर शिरसाट शेगाव, महादेव धवसे वाशिम, गौतम इंगळे शेगाव, रवी शेगोकार शेगाव, सुभाष वाकोडे कनारखेड शेगाव, श्याम पहूरकर भोनगाव शेगाव ,,नारायण दाभाडे शेगाव, प्रल्हाद खोडके डोनगाव , सतीश दांडगे मलकापूर ,अनिल खराटे मोताळा ,गोपाल इंगळे वरवट संग्रामपूर, विवेक शेगोकार शेगाव,कैलास खराटे मोताळा, एन.के.हिवराळे मलकापूर ,उत्तमराव दानवे वर्धा, आधी पत्रकारांची उपस्थिती होती पुढील केंद्र व राज्याच्या नियुक्त्या हे केंद्र व राज्याचे पदाधिकारी करतील त्यामुळे ज्या इच्छुक पत्रकारांना संघटनेत सामील व्हायचे आहे. त्यांनी संघटनेच्या पदाधिकाऱ्यांची संपर्क साधण्याचे आवाहन राष्ट्रीय महासचिव प्रकाश सरदार व राज्यसचिव देवचंद समदूर यांनी केले.