संजय शिंदे ग्रामीण प्रतिनिधी इंदापूर
कला, विज्ञान आणि वाणिज्य महाविद्यालय इंदापूर येथे राष्ट्रीय सेवा योजना विभागातर्फे 24 सप्टेंबर हा राष्ट्रीय सेवा योजना दिन साजरा करण्यात आला.संस्थेचे अध्यक्ष व माजी मंत्री हर्षवर्धन पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली महाविद्यालयामध्ये वृक्षारोपण व व्याख्यानाचे आयोजन करून हा राष्ट्रीय सेवा योजना दिन साजरा करण्यात आला. सदर कार्यक्रमास महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. जीवन सरवदे , विज्ञान विभाग प्रमुख डॉ. शिवाजी वीर, राष्ट्रीय सेवा योजनेचे माजी स्वयंसेवक कुमार शिंदे व आशिष माने उपस्थित होते.अध्यक्ष मनोगत प्राचार्य डॉ. जीवन सरवदे यांनी राष्ट्रीय सेवा योजना विभागाचे कार्य सर्वोत्कृष्ट चालू आहे व विद्यार्थ्यांनी प्रत्यक्ष सहभाग घेऊन श्रमदान सामाजिक कार्य कसे करावे, यातून स्वतःची प्रगती, स्वतःचा व्यक्तिमत्त्वाचा विकास कसा होतो व भारताचा अतिशय सुजन नागरिक कसा बनतो आणि तो दुसऱ्याला बनवण्यास भाग पडतो यासंदर्भात मार्गदर्शन केले.कार्यक्रमाचे प्रास्ताविक राष्ट्रीय सेवा योजना विभाग कार्यक्रम अधिकारी प्रा. उत्तम माने यांनी केले. सदर प्रास्ताविकामध्ये राष्ट्रीय सेवा योजना केव्हा स्थापन झाली, राष्ट्रीय सेवा योजनेचा इतिहास व चिन्ह आणि कर्तव्य या संदर्भामध्ये माहिती दिली. या कार्यक्रमांमध्ये कुमार शिंदे व आशिष माने यांनी आपल्या राष्ट्रीय सेवा योजनेतील कार्यकाळातील अनुभव कथन केले व आम्ही राष्ट्रीय सेवा योजनेच्या माध्यमातून कसे घडलो आणि इंदापूर महाविद्यालयाचे नाव हे विद्यापीठ आणि राज्य स्तरावर कसे पोहोचवले या संदर्भात त्यांनी मार्गदर्शन केले.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन कार्यक्रम अधिकारी प्रा. साठे पी. व्ही. यांनी केले. कार्यक्रमाचे आभार कार्यक्रम अधिकारी प्रा. मनीषा गायकवाड यांनी मानले.कार्यक्रमाचा समारोप राष्ट्रगीताने झाला. यानंतर महाविद्यालयाच्या बॉटनिकल गार्डन मध्ये मोहोगणी, चिंच, पिंपळ, बांबू सीताफळ, कडूलिंब अशा विविध प्रकारचे 200 रोपांचे वृक्षारोपण करण्यात आले.