आनंद मनवर जिल्हा प्रतिनिधी, रायगड
खोपोली :20 ऑगस्ट 2024 रोजी बदलापूर पूर्व शहरात दोन चिमुकल्या मुलींवर शाळेत झालेल्या अत्याचारचा घटनेत संपूर्णमहाराष्ट्र हादरले. या गंभीर प्रकरणात शाळेतील कर्मचारी अक्षय शिंदे याला पोलिसांनी तात्काळ अटक केली मात्र या घटनेचे तीव्र पडसाद उमटले आणि 20 ऑगस्ट रोजी नागरिकांनी रेल्वे रोको आंदोलन केले सरकारने या प्रकरणाची दखलघेतली असून फास्ट ट्रॅक कोर्टात दखल घेतली असून फास्ट ट्रॅक कोर्टात खटला चालवण्याचे काम सुरु झाले. पण घटना क्रमातनवा लुक आला तेव्हा आरोपी अक्षय शिंदे याला रिमांडसाठी तळोजा कारागृहातून नेत असताना मुंब्रा बायपास जवळ पोलिसांनशी झाटापट झाली. शिंदे याने पोलिसाचा सर्व्हिस रिव्हालवर चा ताबा घेऊन सहाय्यक पोलीस निरीक्षक निलेश मोरे यांच्यावर गोळीबार केला. तीन गोळ्या झाडन्यात आल्या त्यातील एक गोली मोरे यांचा पायात घुसली. तर इतर दोन गोळ्या वेध चुकला याच परिस्तिथीत जख्मी निलेश मोरे यांनी धाडस दाखवत प्रत्युतर दिले. तर दुसरे अधिकारी पोलीस निरीक्षक संजय शिंदे यांनी स्वरक्षणासाठी गोळीबार केला दोन गोळ्या अक्षय शिंदेचा गालावर आणि शरीरावर लागल्या दोघांनाही तातडीने छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालयात कळवा येथे दाखल करण्यात आले. माहिती नुसार आरोपी अक्षय शिंदेचा मुर्त्यू झालीची खात्रीलायक बातमी समोर येत मृत्यू


