तुकाराम पांचाळ ग्रामीण प्रतिनिधी धर्माबाद
धर्माबाद : दिनांक 20 सप्टेंबर 2024 रोजी आर्य समाजाचे जेष्ठ सदस्य व लालबहादूर शास्त्री महाविद्यालयाचे विश्वस्त श्री नागनाथ जी नोमुलवार यांच्या पुढाकाराने विद्यालयातील प्राचार्या डॉ. प्रसन्नाराणी तन्नेरू यांनी तेथील ग्रंथालयात सर्व मानव जातीचे धर्मग्रंथ चार वेदांचा हिंदी अनुवादित संच ग्रंथालयात भेट दिल्याबद्दल आर्य समाज धर्माबाद च्या वतीने त्यांचा सत्कार करण्यात आला. तेव्हा आर्य समाजाचे प्रधान श्री सुरेशजी चिंतावार मंत्री श्री गंगासागर चिद्रावार उपमंत्री श्री श्रीनिवास वंगल, पुरोहित श्री अनिलजी आर्य पुस्तकाध्यक्ष श्री किरण मोतेवार सदस्य श्री प्रकाश लिंगपनोर, श्री तुकाराम पांचाळ उपस्थित होते व तसेच महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. कमलाकर कापसे, उपप्राचार्य श्री योगेशजी जोशी संस्थेचे विश्वस्त श्री नागनाथ जी नोमुलवार, श्री नागभूषणजी वर्णी व इतर सर्व विभागाचे विभाग प्रमुख उपस्थित होते त्यावेळी लालबहादूर शास्त्री महाविद्यालय धर्माबाद विद्यालयाकडून आर्य समाजाच्या सर्व प्रतिनिधींचा सत्कार करण्यात आला व सर्व प्रतिनिधींनी महाविद्यालयात झालेल्या बदलांची माहिती घेतली व आनंद व्यक्त केला.