कैलास शेंडे जिल्हा प्रतिनिधी नंदुरबार
नंदुरबार:ग्रामीण कृषि कार्यानुभव व कृषि औद्योगिक संलग्न कार्यक्रम या उपक्रमाच्या माध्यमतून कृषि कन्यां सोनाली देवरे हिने परीवरधे गावातील शेतकऱ्यांना पपई जॅम कसा बनवावा याबद्दल प्रात्यक्षित दाखवले. तसेच परीवर्धा गावाचा अभ्यास करता या गावात बरेच लोक पपई या फळाचे उत्पादन मोठ्या प्रमाणावर घेतात. पण काही कारणास्तव या फळाला बाजारात भाव कमी मिळाला तर त्याचे मूल्यवर्धित स्वरूपाचे पदार्थ तयार करून स्वतःचा एक व्यवसाय कसा सुरू करायचा याबद्दल शेतकऱ्यांना मार्गदर्शन केले . तसेच भविष्यात शेतकरी त्यांचा स्वतःचा व्यवसाय सुरू करावा असे या प्रात्यक्षिताचे उद्दिष्टे होते. या उपक्रमासाठी महाविद्यालयाचे सहयोगी अधिष्ठाता डॉ. यू . बी होले . तसेच चेअरमन डॉ . एस.यू बोराळे. कार्यक्रम अधिकारी डॉ वि.के. बलसाने तसेच कार्यक्रम समन्वयक प्रो . एस . डी . पाटोळे व विषय तज्ज्ञ डॉ वि के बलसाने यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले . सोनाली देवर या कृषि कन्येचा समावेश होता .