कैलास शेंडे जिल्हा प्रतिनिधी नंदुरबार
नंदूरबार:तळोदे येथील गुलाबबाई दुल्लभ राजकुळे कन्या विद्यालय तळोदा, माय भारत नंदुरबार व नगरपालिका तळोदा यांच्या संयुक्त विद्यमाने स्वच्छता पंधरवडा निमित्त विविध कार्यक्रमाचे आयोजन केले होते. यावेळी विद्यार्थिनींनी शालेय परिसराची स्वच्छता करत उत्स्फूर्तपणे सहभाग नोंदवला. यावेळी विद्यार्थिनींना स्वच्छतेची शपथ देण्यात आली. कार्यक्रमास नगरपालिका तळोदा येथील सॅनिटरी इन्स्पेक्टर किशोर मोरे, कोऑर्डिनेटर आकाश हसे, प्रशासकीय अधिकारी राजेंद्र माळी, कन्या विद्यालयाचे मुख्याध्यापक मिलिंद धोदरे, एन आर महाले, योगेश पाटील, तडवी डी एल, इंदिस ए बी, वैशाली देवरे, आकाश महाजन, भाग्यश्री सागर, दिनेश तनपुरे, उल्हास मगरे, अनिल मगरे, हिरालाल पाडवी, धनराज केदार, सुदाम माळी आदींसह शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थिनी मोठ्या संख्येने हजर होते.


