अनिस सुरैय्या तालुका प्रतिनिधि महागांव
महागांव:उमरखेड महागांव वीधानसभेचे वी.आमदार नामदेवराव ससाने यांनी महागांव तालुक्याला वा-यावर सोडले आहे.त्यामुळे महागांव तालुक्यातील जनतेमध्ये आमदार साहेबांन प्रति तीव्र नाराजी दिसत असुन वी.आमदार साहेबांनमुळे येणा-या विधानसभेच्या निवडणुकी मध्ये भारतीय जनता पार्टीला आपली एक सीट गमावण्याची वेळ आली आहे.त्याचे कारण असे की आमदार साहेब निवडुन आल्यापासुन आज पर्यंत त्यानी फक्त कार्यकर्ता वगळुन ईतर जनतेच्या प्रश्नांकडे कधिही लक्ष्य दीलेले दिसत नाही.महागांव शहरातील मतदारां समोर अनेक समस्या आहेत.महागांव शहरातील सर्व अधिकारी हे फक्त प्रभारी असल्याबाबत मागील पांच वर्षांत अनेकवेळा महागांव शहरातील जनतेने वी.आमदार साहेबांन कडे कायमस्वरुपी अधिकारी देण्याबाबत मागणी केली.परंतु आमदार साहेबांनी मागील पांच वर्षापासुन जनतेची मागणी पुर्ण केलेली दिसत नाही.तसेच महागांव शहरासह तालुक्यातील विकासकामेही खोळंबली असुन याकडे सुध्दा आमदार साहेबांनी कधिही लक्ष्य दीलेले दिसत नाही.महागांव शहरातील गल्लि बोळातील मतदार हे आपले प्रश्न मांडण्यासाठी आमदार साहेबांची वाट बघतात परंतु आमदार साहेब शहरात येतात आणि फक्त कार्यकर्त्यांना भेटुन निघुन जातात.त्यामुळे महागांव तालुक्यातील जनतेमध्ये आमदार साहेबांन प्रति तीव्र नाराजी दिसत असुन येणा-या विधानसभेच्या निवडणुकी मध्ये भारतीय जनता पार्टीला याचा परीणाम भोगावा लागणार असल्याची चीन्हे सध्या उमरखेड महागांव वीधानसभा क्षेत्रात दिसत आहे.